आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात जिल्हानिहाय सहकारी रुग्णालये उभारणार : सहकारमंत्री सुभाष देशमुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात सहकारी रुग्णालय सुरू करण्याच्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी दिली. त्यासाठी पहिला प्रस्ताव नांदेड येथून आला. उस्मानाबाद, सांगली येथूनही प्रतिसाद असल्याचेही ते म्हणाले.
   
देशमुख म्हणाले, रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी जिल्हानिहाय सहकारी रुग्णालये सुरू करण्याची ही संकल्पना आहे. त्याने सहकार वाढेल, त्याच्या चळवळीला गती मिळेल. ‘राज्यात कृषी पतपुरवठा, बँकिंग, साखर, दूध, कृषी माल प्रक्रिया, पणन आणि वस्त्राेद्योग आदी क्षेत्रांत सुमारे दोन लाख सहकारी संस्था आहेत. तथापि, आरोग्य क्षेत्रात केवळ ८ ते १० इतकीच सहकारी रुग्णालये आहेत. मागील दोन महिन्यांत कोल्हापूर, उस्मानाबाद आणि नांदेड येथे सहकारी रुग्णालयांची नोंदणी झाली. आैरंगाबाद, नगर, नाशिक, बुलडाणा आदी जिल्ह्यांत नोंदणीची कार्यवाही सुरू झाल्याचे देशमुख यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...