आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी चव्हाट्यावर, निवडणुकीचे राजकीय फटाके, गटबाजीचा स्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - महापालिका निवडणुकीचे निमित्त साधून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने शहर भाजपच्या वतीने हाॅटेल हेरिटेज येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होेते. मात्र पालकमंत्र्यांसह बहुसंख्य नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ िफरविली. शुभेच्छा देण्यासाठी नगरसेवक त्यावेळी पालकमंत्र्यांच्या घरी थांबून होते. या निमित्ताने एेन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर अाल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. महापालिका निवडणुकीचे राजकीय फटाके उडत असताना अंतर्गत गटबाजीचा स्फोट होताना दिसून येत आहे.

पालकमंत्री विजयकुमार देशमुखांना मानणारे नगरसेवक त्यांचे समर्थक कार्यकर्ते हेरिटेज येथील बैठकीस गैरहजर राहिले. उलट हे सर्वजण पालकमंत्र्यांच्या घराजवळ राघवंेद्र स्वामी मठात एकत्र जमले होेते. शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी बोलवलेली पक्षाची बैठक हेरिटेज हाॅटेल येथे शनिवारी पार पाडली, ती अधिकृत होती. यावेळी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, नगरसेवक मोहिनी पत्की, सरचिटणीस हेमंत पिंगळे, दत्तात्रय गणपा, विश्वनाथ बेंद्रे , नगरसेवक पांडुरंग दिड्डी, नागेश वल्याळ, श्रीकांचना यन्नम, सुरेखा अंजिखाने मंचावर होते.

यावेळी बाबूराव घुगे, वीरभद्र बसवंती, जयश्री धुप्पाधुळेसह अन्य पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आणू, असे मनोगत व्यक्त करण्यात आले. आम्ही १९९२ पासून पक्षात काम करतो, सत्ता नसताना अाम्ही पक्षासाठी घरोघरी फिरलो. आता सत्ता आल्यावर निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. नवीन कपडे घालून येणाऱ्यांची कामे होतात. तुमचा प्रभाव पडत नाही, असे सांगून कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

खासदारांची अनुपस्थिती
खासदार अॅड. शरद बनसोडे यांना बैठकीचे निमंत्रण दिले नाही असे सांगण्यात आले. ते पंढरपूर येथे गेले. याबाबत शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांना मोबाइलद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी मोबाइल घेतला नाही.

निरोप नाही
^मी काल आरोग्य शिबिराच्या वेळी उपस्थित होतो. वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी मी १३ तास उभा राहिलो. त्यामुळे मी थकलो होतो. शनिवारी दिवसभर विश्रांती घेतली. बैठकीसाठी मला निरोप नाही.'' विजयकुमारदेशमुख, पालकमंत्री

निम्म्याहून जास्त पदाधिकारी पालकमंत्र्यांकडे
महापालिकेतील२५ पैकी १९ नगरसेवक, शिक्षण मंडळाचे एक सदस्य, परिवहन समितीचे तीन सदस्य, सरचिटणीस प्रभाकर जामगुंडे, विक्रम देशमुखसह बहुतांश पदाधिकारी पालकमंत्री देशमुख यांच्या निवासस्थानी होते. याशिवाय हेरिटेज हाॅटेल येथे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गीसह सहा नगरसेवक, दोन सरचिटणीसह काही पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचा पुढाकार नगरसेवक सुरेश पाटील यांनी घेतला. पालकमंत्री देशमुख, खासदार बनसोडे, सहकारमंत्री देशमुखसह पक्षाचे आठजण एकत्र आले तर ती पक्षाची अधिकृत बैठक म्हणता येईल. आमचा बैठक घेण्यास विरोध नाही पण सर्वांना सोबत घेऊन बैठक घ्या, असा सूर पालकमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत दिसून आला.
बातम्या आणखी आहेत...