आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक चंदनशिवे यांना अटक, जामीन मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महावितरण कंपनीच्या अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी बसप नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. 

२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठ परिसरात वीजपुरवठा बंद झाला होता. बिघाड पाहण्यासाठी अभियंता आल्यानंतर नगरसेवक चंदनशिवे त्यांचा भाऊ यांनी मिळून मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद वसंत जाधव यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिली होती. चंदनशिवे यांनी अटकपूर्व करिता अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने बुधवारी हा अटकपूर्व अर्ज फेटाळला होता. यानंतर पोलिसांनी चंदनशिवे यांना गुरुवारी अटक केली. याप्रकरणी सरकार पक्षाकडून अॅड. राठोड तर चंदनशिवे यांच्याकडून अॅड. संजीव सदाफुले यांनी काम पाहिले. 
 
बातम्या आणखी आहेत...