आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corporator Mashappa Vite, Alakunte Release From Party

नगरसेवक माशप्पा विटे, अलकुंटे यांची पक्षातून हकालपट्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नुकत्याचझालेल्या विधान परिषद निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला हाेता. परंतु पक्षादेश धुडकावून तीनपैकी दोन नगरसेवकांनी मतदान केले. त्याची शिक्षा म्हणून नगरसेवक माशप्पा विटे आणि महादेवी अलकुंटे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य नरसय्या आडम यांनी दिली.

गेल्या आठवड्यात विधान परिषद निवडणूक झाली. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दीपक साळंुखे आणि भाजप पुरस्कृत प्रशांत परिचारक रिंगणात होते. माकप आणि बसपने या निवडणुकीत अलिप्त राहण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु दोन्ही पक्षातील दोन नगरसेवकांनी मतदान केले.

माकपच्या सुनंदा बल्ला आणि बसपचे आनंद चंदनशिवे या दोघांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करत मतदान केंद्राकडे पाठ फिरवली. या निवडणुकीसाठी पैशांचा खूप वापर झाल्याची चर्चा होती.

माकपची मते घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. आडम यांना संपर्क साधला होता. परंतु पक्षीय पातळीवर अलिप्त राहण्याची भूमिका असल्याने मतदान करायचे नाही, असे ठरले होते. परंतु विटे आणि अलकुंटे यांनी पक्षाच्या तत्त्वांना जागले नाही. म्हणून त्यांना पक्षातून काढणे हाच पर्याय असल्याचे श्री. आडम यांनी जाहीर केले.