आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएफ कार्यालयातील लिपिकासह दोघांवर लाच घेताना कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दोनवर्षे वेतनाच्या रकमेचे फरक बिल शिल्लक वेतन बिल काढण्यासाठी २३ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी वेतन भविष्य निर्वाह निधी पडताळणी कार्यालयातील लिपिकासह दोघांना ताब्यात घेण्यात अाले अाहे. ही कारवाई अाज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
लिपीक संतोष जनार्दन ठाकूर (वय ५१) त्यांचे सहकारी विजापूर रोडवरील महालक्ष्मी प्रशालेचे प्रयोग शाळा परिचर उमेश प्रकाश काळे (वय ३८) या दोघांना ताब्यात घेण्यात अाले अाहे. ठाकूर यांनी पैशाची मागणी करून काळे यांच्याकडे देण्यास सांगितले होते. त्यानुसारकाळे यांना रंगेहाथ पकडले.
ठाकूर यांनी पैसे मागितल्यामुळे दोघांवर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला अाहे. एका शिक्षकाचे दोन वर्षाचे फरक शिल्लक वेतन बिल तटले होते. ते काढण्यासाठी ठाकूर यांनी पैशाची मागणी केली. ते पैसे काळे यांच्याकडे देण्यास सांगितले होते. मागील अाठवड्यात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपीक संजय बाणूर यास पाच हजारांची लाच घेताना अटक झाली होती. शिक्षण विभागातील ही घटना ताजी असताना अाज पुन्हा माध्यमिक शिक्षण विभागात ही घटना घडली. यावरून शिक्षण विभागातील लाचखोरीचा प्रकार उजेडात अाला.
बातम्या आणखी आहेत...