आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: काँग्रेस कार्यालयात १.७ लाखांचा अपहार, जेलरोड ठाण्यात गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरकाँग्रेस कार्यालयात एक लाख ७० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कार्यालयीन प्रमुख राजकुमार आयगोळे यांच्याविरुद्ध पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आयगोळे यांनी उमेदवारांकडून आलेले अर्ज आणि पक्षनिधी जमा करून बँकेत भरता अपहार केला. ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेस कार्यालयातील कर्मचाऱ्याने निधीत अफरातफर केल्याचा प्रकार घडल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे. 
 
श्री. आयगोळे यांच्याकडे प्रभाग १० ते १८ प्रभागातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्षनिधी जमा करण्याची जबाबदारी होती. दररोज जमा झालेली रक्कम बँकेत जमा करण्याचे आदेश होते. पण, आयगोळेंनी त्यांच्याकडे जमा असलेले तब्बल एक लाख ७० हजार रुपये बँकेत जमा करता स्वत:कडे ठेवून त्याचा गैरवापर केला. सहायक पोलिस निरीक्षक आयलाने पुढील तपास करीत आहेत. 
 
आयगोळे यांच्याशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याबाबतचा फलक शहराध्यक्ष खरटमल यांनी काँग्रेस भवनमध्ये गेल्या आठवड्यात लावला होता. या निमित्ताने पारदर्शकता पक्षनिष्ठेची ‘बाधा’ काँग्रेसभवनातील कर्मचाऱ्यांनाही झाल्याची चर्चा सुरू आहे. 
बातम्या आणखी आहेत...