आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिबक गैरव्यवहार: आणखीन २७ लाखांचा गैरव्यवहार चव्हाट्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज- माळशिरसतालुक्यातील ठिबक सिंचन योजनेतील भ्रष्टाचार प्रकरण राज्यात गाजत आहे. आता अग्रीम रकमेचा २७ लाखांचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. मार्च २००८ ते मार्च २०१२ कालावधीत ६९ अधिकाऱ्यांनी २७ लाख ८० हजार उचलले. परंतु, हिशेब मुदतीत देण्यात आला नाही असे उघड झाले आहे.

राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेतील कोट्यवधींचा घोटाळा उघड करणारे माळीनगर येथील कृषिभूषण सुरेश वाघधरे यांनी माळशिरस तालुका कृषी कार्यालयात २७ लाख ८० हजार अग्रीम रकमेच्या गैरव्यवहाराबद्दलची माहिती दिव्य मराठीला दिली. मार्च २००८ ते मार्च २०१२ या कालावधीत माळशिरस तालुका कृषी कार्यालयातील ६९ अधिकाऱ्यांनी विविध कार्यक्रम राबवण्याकरता २७ लाख ८० हजार ६०५ एवढी अग्रीम रक्कम उचलली. रकमेतून राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रम अहवालासह सदर रकमेचा हिशेब एक महिन्यात देणे बंधनकारक असते. हिशेब देण्यात आला नाही यासाठी अधीक्षक कृषी अधिकारी दादासाहेब सप्रे यांच्या दक्षता पथकाने फेब्रुवारी २०१३ रोजी प्रकरणाची चौकशी केली. चौकशीवेळी बी. पी. नेटके तालुका कृषी अधिकारी होते.

माळशिरस तालुक्यातील त्या-त्या काळातील अधिकाऱ्यांनी कार्यक्रम राबवण्यासाठी अग्रीम रक्कम उचलली होती. कार्यक्रम घेण्यात आले होते. पावत्या आणि हिशोब देण्यास उशीर झाला आहे.” आबासाहेबधापते, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी

दाखलकरून घेण्यात आलेली बिले खोटी आहेत. हे कशावरून म्हणायचे. मात्र बिले खूप उशिरा दाखल कलेेली आहेत, ही वस्तुस्थिती आहे.” बी.पी. नेटके, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी

हा अग्रीम रकमेचा गैरव्यवहार तत्कालीन तालुका कृषी अधिकारी आबासाहेब धापते आणि मोहन रेळेकर यांच्या काळात घडला आहे. बी. पी. नेटके उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत खोटी बिले दाखल करून का घेतली, याची चाैकशी व्हायला हवी. मला माहिती देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे.” सुरेशवाघधरे, कृषिभूषण, माळीनगर

कृषिभूषण सुरेश वाघधरे यांचा माहितीच्या अधिकारातील अर्ज आला आहे. माहिती काढण्याचे काम सुरू आहे. मी माहिती अधिकारी नाही. त्यामुळे मला या संदर्भातील याबाबत पूर्ण माहिती नाही. आर.एन. जीतकर, कृषी अधिकारी, माळशिरस

या योजनांचा हिशेब दिला गेला नाही
योजनारक्कम:
डाळिंबतेलकट डाग नियंत्रण ५ लाख ८५ हजार २०३
विस्तार प्रशिक्षण १३ लाख ४५ हजार ७४७
आत्मा योजना ४ लाख ३६ हजार
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ४ लाख १३ हजार ५५
डीपीडीसी ३ योजना लाख
एकूण २७ लाख ८० हजार ६०५