आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासह जगभरात धार्मिक उन्माद हिंसाचार वाढताेय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आंतरराष्ट्रीय पातळीवरील धार्मिक उन्माद वाढवला जात आहे. हिंसाचाराला खतपाणी घालून प्रश्न अधिकाधिक जटील बनवला जात असल्याचे मत, मुंबई येथे फिराेज मिठीबोरवाला यांनी व्यक्त केले. बार्शीच्या समतादर्शन प्रतिष्ठानतर्फे शनिवारी फडकुले सभागृह येथे धार्मिक हिंसाचारविरोधी परिषद आयोजिली होती. तीत मिठीबोरवाला यांनी मत व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय धार्मिक उन्माद हिंसाचार हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. डॉ. सुरेश खैरनार यांनी परिषदेत मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी अरुणा बुरटे होत्या. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, दत्ता गायकवाड, प्रकाश बुरटे, अॅड. रा. गो. म्हैत्रस आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मिठीबोरवाला म्हणाले, “सध्या इसिसकडून सुरू असलेला हिंसाचार जगापुढे चिंतेचे कारण बनलेला आहे. मुळात अल कायदा या संघटनेचीच इसिस ही सुधारित आवृत्ती मानावी लागेल. अल कायदाची निर्मिती अमेरिकेनेच आपल्या राजकीय स्वार्थासाठी केली. अमेरिकेने तेलसंपन्न देशात आपल्या फायद्यासाठी वाढवलेली ही संघटना. नंतर यातून इसिस तयार झाली. याचे मूळ २००६ मध्ये दिसले इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केला तो सौदी-अमेरिकेच्या मदतीने. लेबल होते मानवता वाद राखण्यासाठी, पण उद्देश होता तेथील हुकूमशहा गदाफी यांचे उच्चाटन. लेबनानचे तुकडे केले. पण इराण, सिरिया, पॅलेस्टाइन पट्ट्यातील धार्मिक कट्टरवाद्यांनी या काळात जम बसवला. लिबिया संपला पण अल कायदा सक्रिय झाला. अल कायदा डोईजड झाल्यानंतर त्याचे उच्चाटन करताना इसिस तयार झाला.

डॉ. खैरनार म्हणाले, “दशहतवादाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्रात एटीएस स्थापन झाली. या पथकाला प्रशिक्षण दिले ते पुरोहित या अधिकाऱ्याने. नांदेड येथील हल्ल्याचा खरा तपास उजेडात आला असता तर पुढील सगळे हल्ले कदाचित झाले नसते. पण केवळ दोनच महिन्यांत नागपूरच्या आरएसएस मुख्यालयाजवळ तीन दहशतवादी मारले जातात, ही घटना उघड झाली. त्यांच्याजवळ ३५० किलो आरडीएक्स होते, कोणाला काहीही इजा होता तीनही दहशतवादी मारले गेले. दहशतवादी असे सोबत ओळखपत्र घेऊन हल्ला करतात का? मुंबई हल्ल्यात हेमंत करकरे हे एटीएस प्रमुख होते. बुलेटप्रूफ जॅकेट असताना त्यांना गोळी लागते कशी? त्यांच्या पोस्टमार्टेमचा अहवाल त्यांच्या पत्नीला मागणी करूनही का दिला गेला नाही? यामागे खूप गौडबंगाल आहे. हे काय घडते, याचा बोलावता धनी कोण? याची उत्तरे शोधली तरी भारतातील धार्मिक उन्मादाचा हिंसाचाराचा खरा चेहरा समोर येईल.
बातम्या आणखी आहेत...