आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७५ टक्के नगरसेवक मौनीबाबा! १७ पैकी दोनच महिला सदस्यांनी मांडली आक्रमक भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - प्रभागातील नागरिकांना विकास कामांचे आश्वासन देऊन पाच वर्षापूर्वी पालिकेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी गेलेल्या सुमारे ७५ टक्के सदस्यांनी सभागृहात विकासाचे प्रश्नच मांडले नसल्याचे समाेर आले आहे. यापैकी महिला सदस्यांनी तर बहुतांश सभेला दांडी मारली, काही वेळा उपस्थिती लावली तीही स्वाक्षरीपुरतीच. विशेष म्हणजे ३३ पैकी केवळ सदस्यांनी पाच वर्ष पालिकेचे सभागृह दणाणून सोडले. सत्ताधारी असूनही काही सदस्यांनी विकासकामांसाठी प्रसंगी सभागृह डाेक्यावर घेतले. आता पालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे. मात्र, इकडे मौनी नगरसेवकही पुन्हा संधी शोधत आहेत, हे विशेष.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने परिसराचा विकास अभिप्रेत असतो. पालिका शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. विशेष म्हणजे शहरी नागरिकांच्या अपेक्षाही माफक असतात. रस्ते, गटारी, स्वच्छता, पिण्याचे मुबलक पाणी, पथदिवे, आरोग्यसेवा, या मूलभूत बाबींची पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा असते. मात्र,काही भागात लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे तर काही भागात पालिकेतील राजकारणामुळे विकासाचे तीनतेरा वाजतात. परिणामी विकास खुंटत जातो. उस्मानाबाद पालिकेच्या वर्षापूर्वी निवडणुकीत विविध राजकीय पक्षाच्या वतीने जाहीरनामा काढून त्याची वचनपूर्ती करण्याचे आश्वासन दिले होते. शासनस्तरावरील धोरणात्मक निर्णयाचा अडसरवगळता पालिका स्तरावर शक्य असणाऱ्या विकासांच्या बाबींचीही पूर्तता होऊ शकली नाही. त्यामध्ये भूयारी गटारी, चोवीस तास पिण्याचे पाणी आदी बाबींचा समावेश आहे. मात्र, प्रभागातील अंतर्गत रस्ते,नळाला नियमित पाणी, कचरा उचलण्याची यंत्रणा, पथदिव्यांची तात्काळ दुरूस्ती, अशी कामे सदस्यांनी पाठपुरावा करून पूर्ण करणे आवश्यक आहे. शिवाय या बाबींची पूर्तता होत नसल्यास पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आवाज उठविणे गरजेचे आहे. मात्र, प्रभागातील जनतेच्या प्रश्नासाठी झगडणारे सदस्य अत्यंत कमी असल्याचे पाच वर्षातील स्थितीवरून लक्षात येते. पालिकेत ३३ सदस्य असून, त्यापैकी २३ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत.काँग्रेसचे आणि सेना-भाजपचे ४, अशी संख्या आहे. शिवसेनेचे दोन,काँग्रेसचे तीन, असे पाच सदस्य वगळता विरोधातील अन्य सदस्यांनी महत्वाच्या चर्चेत सहभागही नोंदविलेला नाही.दोन वगळता अन्य महिला सदस्यांचा आवाजही अत्यंत क्षीण होता. त्यामुळे सभागृहात प्रश्न मांडणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागात आपोआप विकास झाला असेल का, असाही प्रश्न उपस्थित होतो. बहुतांश सदस्यांनी सभागृहात येऊन केवळ स्वाक्षरी करून काढता पाय घेतल्याचे दिसून आले. काहींनी लेखी मागण्या केल्या, मात्र त्याची पूर्तता होत नसल्याची ओरडही निवेदनापलीकडे केली नाही.

कामेहोत नसल्याने आंदोलन :विरोधी पक्षातील सगळेच सदस्य मौनी नव्हते तर शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव, प्रेमाताई पाटील, काँग्रेसचे गटनेते नगरसेवक खलील सय्यद, नादेर हुसेनी, मधुकर तावडे यांनी वारंवार विकासाच्या प्रश्नावर पालिका सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. किंबहुना, शिवसेनेचे सोमनाथ गुरव यांनी प्रभागात विकास कामे होत नसल्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले. त्यानंतर प्रेमाताई पाटील यांनीही प्रभागातील महिलांसोबत आंदोलन केले.

सत्ताधारीसदस्यांचा हंगामा :विरोधी पक्षातील सदस्यांची संख्या तुलनेने कमी असली तरी विकासासाठी भांडण्यामध्ये कमी पडलेल्या या सदस्यांनी सभागृहाबाहेरही तक्रार केली नाही.याउलट विरोधकांपेक्षा अधिक आक्रमक प्रश्न मांडून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले. प्रभागातील कामे मोठ्या प्रमाणावर करून घेतली. यामुळे सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात अधिक विकास दिसत आहे.
विकास खेचून आणला
काहीसदस्यांनी आपल्या प्रभागात विकास व्हावा, यासाठी पालिकेच्या सभागृहात गोंधळ घातल्याचे माध्यमातून जनतेसमोर येत होते. अशा सदस्यांनी रस्ते, गटारींच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे करून घेतली आहेत. सत्ताधारी सदस्यांनीच यामध्ये बाजी मारली.

विरोधकही प्रभावहीन
सभागृहामध्येविरोधकांची कामे होत नसल्याची तक्रार असते. उस्मानाबाद पालिकेत विरोधी पक्षाचे सदस्यही प्रभावहीन ठरले. ठराविक सदस्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली, मात्र उर्वरित सदस्यांनी पाच वर्षात विशेष उल्लेखनीय प्रश्न मांडून त्याची सोडवणूक करून घेतल्याचे दिसले नाही.

सत्ताधाऱ्यांनी दाबला आवाज
^विरोधीसदस्यांच्याप्रभागात विकासकामे होऊच नयेत, याची पुरेपूर काळजी सत्ताधारी घेत होते. त्यामुळे कितीही ओरड केली तरी त्याचा विकासासाठी फायदा होत नव्हता. विकासकामे झाली तर विरोधकांसाठी वातावरण अनुकूल होईल, अशी भीती सत्ताधाऱ्यांना होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून विकास आणि आवाज दाबण्याचा प्रकार झाला. -सोमनाथगुरव, गटनेता, शिवसेना

संख्याबळ
२३
राष्ट्रवादीकाँग्रेस
काँग्रेस
शिवसेना
भाजप पुरस्कृत
-------------
बातम्या आणखी आहेत...