आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Counteract Change Thought Dismiss From Commissioner

मक्तेदार बदलण्याचा स्थायीचा निर्णय आयुक्तांनी नाकारला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - १४ ऑगस्ट २०१४ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित असताना एमआयडीसीतील एक रस्ता वगळता अन्य २० रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. संथकामामुळे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी युनिटीकडून सुरू असलेले १४ रस्ते वगळता अन्य तीन रस्त्यांसाठी नव्याने मक्ता काढला.
त्यामध्ये आवताडे यांनी मक्ता देण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी ३०.२४ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवला. त्यावर स्थायीत चर्चा झाली. हे काम अावताडे यांच्याऐवजी पूर्वीचे मक्तेदार युनिटी यांना देण्याचा ठराव स्थायीत झाला होता.
नगरोत्थान योजनेतून शहरात २३४.९६ कोटींचे २१ मुख्य रस्ते (८२.४९ किमी) करण्यात येत आहेत. युनिटी कन्स्ट्रक्शनकडून हे काम केले जात आहे. या कामाची वर्कऑर्डर १४ फेब्रुवारी २०१३ रोजी काढण्यात आली.

महाराष्ट्रसुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत ३० कोटींचे तीन रस्ते करण्यात येत आहेत. या कामाचा मक्ता पूर्वीच्या युनिटी कन्स्ट्रक्शनला देण्याचा ठराव महापालिका स्थायी समितीत करून तो मंजुरीसाठी मनपा प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता. स्थायीचा प्रस्ताव अमान्य करत अावताडे यांना मक्ता देण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या सभेकडे पाठविला आहे.

नगरोत्थान योजनेतील रस्त्याची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मक्ता बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ३० कोटींच्या रस्ते कामांची नव्याने निविदा काढून स्थायीकडे पाठविला होती. स्थायी समितीत युनिटीलाच मक्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विषयावर महापालिका विधानसल्लागार यांनी स्थायीला मक्तेदार बदलण्याचा अधिकार नाही. दर कमी करण्याचा अधिकार आहे, असा अभिप्राय दिला. त्यामुळे स्थायीचा निर्णय फिरवत पुन्हा अवताडे यांना मक्ता देण्याबाबत प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीकडे पाठवला आहे. या आठवड्यात होणा-या स्थायी समितीपुढे विषय येण्याची शक्यता आहे.