Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» Couple Torture A Youth In Barshi Solapur

तो तिच्याशी मारायचा तासनतास गप्पा, एक दिवस तिच्या पतीने बोलवून करायला सांगितले असे

बार्शी येथे एका तरुणाला शेजारी राहणाऱ्या महिलेशी तासनतास गप्पा मारल्याने आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 19:05 PM IST

सोलापूर- बार्शी येथे एका तरुणाला शेजारी राहणाऱ्या महिलेशी तासनतास गप्पा मारल्याने आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. या तरुणाच्या नातलगांनी तसा आरोप लावला आहे. ज्या महिलेशी हा तरुण गप्पा मारायचा त्या महिलेच्या पतीने त्याला या महिलेशी लग्न करण्यास सांगितले. याचा मानसिक धक्का बसल्याने युवकाने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
महिलेनेही टाकला लग्नासाठी दबाव
- बार्शी तालुक्यातंर्गत येणाऱ्या वाणेवाडी गावात राहणाऱ्या सुनील यादव (वय 23) या युवकाने रविवारी पाठीला मोठा दगड बांधून विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली.
- पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर या तरुणाच्या वडिलांनी शेजारी राहणाऱ्या महिलेबद्दल आणि तिच्या पतीबद्दल पोलिसांकडे तक्रार केली.
- तरुणाच्या वडिलांनी आरोप लावला आहे की, शेजारी राहणाऱ्या श्रीराम जाधव आणि त्यांच्या पत्नीने त्याच्यावर दबाब टाकला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली.
महिला सुनीलला म्हणाली, तु केले माझे जीवन उद्धवस्त
- सुनीलच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रीराम जाधव यांनी सुनीलला आपल्या घरी बोलावले होते.
- त्यावेळी श्रीराम जाधव त्याला म्हणाले की, तु माझ्या पत्नीशी फोनवर सारखा बोलत असतो. त्यामुळे आता तुला तिच्याशी लग्न करावे लागेल.
- जाधवची पत्नी त्याला म्हणाली, मी तुझ्याशी बोलत असल्याने माझे जीवन उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे मी आता तुझ्याशीच लग्न करणार आहे.
- जाधवची पत्नी त्याला म्हणाली, मी तुझ्याशी बोलत असल्याने माझे जीवन उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे मी आता तुझ्याशीच लग्न करणार आहे.
- जाधव पती-पत्नी धमकावत असल्याने सुनील घाबरला होता. बदनामीच्या भितीने त्याने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली.
- पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सध्या तरी या प्रकरणात कोणालाही अटक कऱण्यात आलेली नाही.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended