आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन अपत्ये, तरी लढवली निवडणूक: भाजपच्या नगरसेवकपदास काेर्टाची स्थगिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका निवडणूकीत भाजपकडून निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक २६ ब च्या उमेदवार राजश्री अनिल चव्हाण यांना नगरसेवक म्हणून काम करण्यास स्थगितीचे आदेश दिवाणी न्यायाधीश व स्तर श्रीमती व्ही. पी. पाटील यांनी दिले आहेत. 
 
या प्रभागातील काँग्रेसच्या उमेदवार उमा विजय पारसेकर यांनी चव्हाण यांना तीन अपत्ये असल्याने त्या निवडणुकीस अपात्र ठरतात अशी याचिका  दाखल केली होती. शिवाय उमेदवारी अर्ज भरताना आपल्या नामनिर्देशन पत्रामध्ये व शपथपत्रामध्ये आपणास तीन अपत्ये असल्याचे कबुल केले आहे. परंतू निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कागदपत्रांची छाननी न करता घाईगडबडीने व निष्काळजीपणे चव्हाण यांचे नामनिर्देशनपत्र बेकायदेशीरपणे मंजूर केले, असा आरोप अॅड. व्ही. एस. आळंगे यांनी युक्तिवाद करताना केला. 

सदर प्रकरणी चव्हाण यांना कायदा माहित असतानादेखील निवडणूक लढविली व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचा नामनिर्देशन मंजूर केले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी व चव्हाण यांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याची मागणी अॅड. आळंगे यांनी केली. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरीत ही स्थगिती देण्यात आली आहे. तसेच चव्हाण यांना नगरसेवक म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या कामकाजात भाग घेऊ नये, सदर पदाचा लाभ घेऊ नये अशी ताकीद चव्हाण यांना देण्यात अाली. या निकालामुळे भाजपाच्या सत्ता स्थापनेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...