आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court's Final Decision Determine In Oscar Geetanjali Kulkarni

'कोर्ट'चा निवाडा आता ऑस्करला, अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांचे मनोगत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ऑस्करसाठी प्रवेश मिळणे म्हणजे वेगळेपणाने काम करणाऱ्या, वेगळा विषय वेगळ्या पद्धतीने मांडणाऱ्या चित्रपटाला दिग्दशर्काला मिळालेला जगमान्यतेचा पुरस्कारच आहे, अशी भावना कोर्ट चित्रपटातील अभिनेत्री आणि सोलापूरच्या सून गीतांजली कुलकर्णी यांनी 'दिव्यमराठी'कडे व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'कोर्ट'ची ऑस्करवारी पक्की झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी साधलेला संवाद त्यांच्याच शब्दात...
आनंदआणि अभिमानही... : ऑस्कर कमिटीने थेट एंट्री द्यावी हे खूप महत्त्वाचे आहे. खूप आनंद झाला आहे आणि अभिमानही वाटतोय. सिस्टीम कोण बनवते? त्याच्या नावाने आपण का ओरडतो? आपणही त्याचा भाग आहोत ना? मग हे असे का घडते, या विषयावर हा चित्रपट प्रकाश टाकतो. एक माणूस आणि कलावंत म्हणून झालेला हा प्रवास स्वअनुभवासाठी खूप महत्त्वाचा ठरला. चित्रपट पाहिल्यावर माणूसही संवदेनशील बनतो.

दिग्दर्शक चैतन्यला अमेरिकेतलाही पुरस्कार
चैतन्यला अमेरिकेच्या ‘लाइन ऑफ फ्यूचर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच्या वेगळ्या कलाकृतीचे कौतुक भारताच्या ऑस्कर कमिटीनेही एकसुराने केले. अनेक चित्रपट महोत्सवातही 'कोर्ट' चित्रपटाचा गौरव झाला.

कोर्ट चित्रपटाविषयी...
ही एका शाहिराची वास्तववादी कथा आहे. आजच्या समाज व्यवस्थेवर, प्रशासकीय यंत्रणेवर सडेतोडपणे चित्रभाषेच्या माध्यमाने भाष्य करणारा हा वेगळया विषयाचा, प्रचंड वेगळेपण मांडणारा चित्रपट आहे. तेच तेच दाखवता कोर्टमध्ये एका वेगळ्या विषयाला, वेगळ्या मांडणीला महत्त्व देण्यात आले आहे. हेच या चित्रपटाचे यश. जगभराच्या प्रेक्षकांनी याला पसंती दिली.