आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुलत भावाच्या बायकोचेच अपहरण, करमाळ्यात गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाळा - स्वतःच्या चुलत भावाच्या बायकोला पळवून नेल्याप्रकरणी एकावर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ नोव्हेंबर २०१७ रोजी तालुक्यात एका गावात घडली आहे. रात्री दोननंतर घरात पत्नी नसल्याचे कळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

 

याबाबत अधिक माहिती अशी : फिर्यादी राकेश (बदललेले नाव) कुटुंबासोबत राहत होता. आरोपी गणेश (बदललेले नाव) फिर्यादीची पत्नी अमृता (बदललेले नाव) भावकीतील असल्याने आणि नवऱ्याचा चुलत भाऊ असल्याने ओळख होती. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. याबाबत अनेकदा दोघांना समजावून सांगूनही दोघे ऐकत नव्हते. 


११ नोव्हेंबरला रात्री जेवण करून झोपल्यानंतर रात्री उशिरा जाग आल्यानंतर राकेशने पाहिले की पत्नी अमृता शेजारी नाही. तिचा शोध घेतला तरी ती कुठे आढळून आली नाही. या बाबत सकाळी शोध घेतला असता गणेश हाही रात्रीपासून घरी नसल्याची माहिती मिळाली. यावरून अमृतास गणेशनेच पळवून नेले असल्याची खात्री पटली. शोधानंतर करमाळा पोलिसात पत्नीच्या अपहरणाचा गुन्हा केला. तपास हवालदार हणमंत माने करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...