आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रॅक ८७ बसगाड्या बदलून नव्या देण्याची पालिका करणार मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिटीबसचेसी क्रॅकप्रकरणी आरटीओ विभागाने महापालिकेस मत नोंदवत नोटीस दिली. त्या ८७ गाड्या रस्त्यावर धावणे अशक्य असून, आरटीओ विभागाच्या पत्राचा आधार घेत महापालिका अशोक लेलँड कंपनीस अंतिम तीन दिवसांची नोटीस देणार अाहे. त्या गाड्या घेऊन जावे. त्याबदल्यात नव्या गाड्या द्या, अशी भूमिका राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितली.
गाड्यांचे रजिस्टर रद्द का करू नये, अशी नोटीस आरटीओने मनपास दिली. आयुक्तांनी परिवहन व्यवस्थापक श्रीकांत म्याकलवारसह संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबत श्री. काळम-पाटील म्हणाले की, या गाड्या आता रस्त्यावर धावणे शक्य नाही. अारटीओ विभागाने दिलेल्या पत्राचा आधार घेत कंपनीस अंतिम तीन दिवसांची नोटीस देणार आहे. गाड्या घेऊन जावे आणि नवीन गाड्या द्या, अशी भूमिका त्यात मांडणार आहे. तरीही कंपनीकडून प्रतिसाद मिळाल्यास परिवहन समितीचा निर्णय घेऊन, सभागृहाकडे धोरणासाठी प्रस्ताव चार ते पाच दिवसांत पाठवला जाईल. आतापर्यंत महापालिकेचे झालेले नुकसानाची भरपाई मागण्यात येणार आहे.

गाड्या बदलून द्या
^आरटीओविभागाचे पत्र पाहता कंपनीने बसगाड्या आता बदलून द्याव्यात आणि आतापर्यंत महापालिकेचे जे नुकसान झाले ते त्यांनी भरून द्यावे. याबाबत महापालिका सभागृहात चर्चा होईल. कंपनीने आता जबाबदारी घ्यावी.” अॅड.यू. एन. बेरिया, नगरसेवक
बातम्या आणखी आहेत...