आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकासाची चर्चा अाता पुरे, प्रत्यक्ष कामाचा अल्पावधीत श्रीगणेशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरच्या विकासाबाबत आजवर सर्वांकडून केवळ आश्वासने आणि आरोळ्याच एेकल्या. पण प्रत्यक्षात काहीच झाल्याचे दिसत नाही. आता चर्चा बास करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा, असा एकंदर सूर सृजनसंवाद या कार्यक्रमातून उपस्थितांतून पुढे आला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मलाही तेच अपेक्षित आहे, त्या अनुषंगाने पावले उचलत असल्याचे सांगितले.
नागरिकांसाठी रविवारी हेरिटेज गार्डन येथे सकाळी साडेनऊ वाजता सृजन संवाद आयोजिण्यात आला होता. यात शहरातील उद्योजक, साहित्यप्रेमी, शेतकरी, प्राध्यापक, साहित्य परिषद, नाट्य, विद्यार्थी, विविध संघटना, पुरातत्वज्ञ, डॉक्टर्स, अभियंते, वकील, महिला तमाम सोलापूरकरांनी सहभाग नोंदविला.

प्रत्येकाच्या बोलण्यातून सोलापूरचा विकास हाच मुद्दा येत होता. प्रत्येकजण अपेक्षा त्या पूर्ण कशा करता येतील अशा सूचनाही मांडत होते. यावेळी मंचावर श्री. देशमुख यांच्यासह प्रा. ए. डी. जोशी, उद्याेजक दत्ता सुरवसे, कारखानदार पेंटप्पा गड्डम, प्रा. जी. के. देशमुख, संयोजक प्रा. नरेंद्र काटीकर, वीरशैव महिला आघाडीच्या पुष्पावती गुंगे आदींची उपस्थिती होती.
प्रा.शेखर साळुंखे
पंतप्रधानांची माय जिओ ही सुविधा उत्तम असून आपल्या समस्येला सरकारी अधिकारी दाद देत नसतील तर याचा अवलंब करावा. अशा संवादातून समस्यांचे निराकरण होईल. सोलापुरातील ऐतिहासिक वस्तू एकत्र करून संग्रहालय करून याची पब्लिसिटी करावी.
Áहरिभाऊ गोडबोले
जिल्हाउद्योग मित्रची बैठक नियमित व्हावी, असा नियम पण होत नाही. ग्रॉस डोमेस्टिक प्रोजेक्टची आकडेवारी कमी आहे, ती वाढवण्यावर भर द्यावा.

Áपद्माकर कुलकर्णी
महानगरपालिकेच्या बंद शाळा आम्हाला देत तेथे मराठी भवन करून द्यावे. राष्ट्रीय नाट्य स्पर्धा शहरात होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

Áसुधा अळ्ळीमोरे
पतंजलीच्या माध्यमातून सोलापुरात पतंजली पापड जनसामान्यांना परवडतील अशी जनवस्त्र योजना अल्पावधीत सुरू होत यातून विडी कामगार महिलांना रोजगार उपलब्ध होणार.

Áडॉ.नारायणदास चंडक
सोलापूर मेडिकल हब असून येथे परगावहून बरेच रुग्ण येतात. त्यांच्या नातेवाइकांसाठी सुसज्ज निवास व्यवस्था करावी.

Áपेंटप्पा गड्डम
महापालिकेच्या कारभारात जोपर्यंत पारदर्शकपणा येत नाही, तोपर्यंत शहराचा विकास अशक्य आहे. शहरात उद्योगवाढ आणि विकासासाठी पायाभूत सुविधांची उभारणी खूप महत्त्वाची आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे.

Áप्रा.अनिल पाटील
उपलब्ध क्रीडांगणात मूलभूत सुविधा देत आंतरराष्ट्रीय सामने कसे भरवता येतील? पाहावे. ओस मैदाने फुलवावीत.

Áसीमंतिनीचा फळकर
शहरातविविध पुरातन वास्तू आहेत. जागतिक दर्जाचे संवर्धन व्हावे. पर्यटन रोजगार निर्मिती व्हावी.

Áअॅड.जे.जे. कुलकर्णी
शहरातील अतिक्रमण काढावे, खंडपीठासाठी प्रयत्न व्हावे, चांगल्या पालिका आयुक्तांच्या बदल्या थांबवाव्यात.

Áप्रा.रोहण कुरी
मॅनटू मॅन सोर्सिंग एंड टू एंड सोल्यूशन हवे.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हेरिटेज गार्डन येथे रविवारी आयोजिलेल्या सृजन संवाद उपक्रमास उपस्थित नागरिक.
बातम्या आणखी आहेत...