आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदूरमधील खून प्रकरण: नरबळीचा कुटुंबीयांना संशय, काझीला पोलिस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा- नंदूर येथील अमीर अहमद दिलीप मुलाणी (वय १५) मुलाचे अपहरण करून गळा चिरून खून केल्याप्रकरणी अटकेतील संशयित नजीर नूरमहमद काझी (वय ४२, रा. मंगळवेढा) यास येथील न्यायालयाने शुक्रुवारी (दि. १५) सात दिवसांची पोलिस कोठडी दिली. दरम्यान आज अनिसच्या कार्यकर्त्यांनी नंदूर येथील हत्या झालेल्या अमीरअहमद दिलीप मुलाणी याच्या घरी जाऊन कुटुंबाशी चर्चा केली. हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय मुलाणी कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. तपासाविषयी बोलणे उचित नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

१० जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता शाळा सुटल्यानंतर येथील चोखामेळा चौकाकडे गेलेला अमीरअहमद रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे त्याचे वडील दिलीप माैला मुलाणी यांनी ११ जानेवारी रोजी येथील पोलिसांत अपहरणाची फिर्याद दिली होती. १३ जानेवारी रोजी दुपारी मरवडे रस्त्यावरील पेट्रोल पंपापासून एक किलोमीटर अंतरावील कालव्यात अमीरअहमद याचा मृतदेह सापडला. निर्घृण खून करून त्याचा प्रेत टाकून िदले होते. मजनू गैबी मुलाणी या रिक्षाचालकाने दूरध्वनीवर पोलिसांना ही खबर दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी नजीर काझी याला गुरुवारी (दि. १४) अटक केली. शुक्रवारी येथील न्यायालयात उभे केले असता २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, का दिली पोलिस कोठडी...