आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १० दिवसांत जप्त केले रिव्हाॅल्वर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरातील गुन्हेगार अगदी सहजपणे रिव्हाॅल्वर वापरत अाहेत. मागील दहा दिवसांत तिघांकडून पाच रिव्हाॅल्वर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले अाहेत. यावरून घटनेचे गांभीर्य समोर आले आहे. अट्टल घरफोड्या सुनील ऊर्फ दयामण्णा यल्लप्पा शिवपुरे (वय ३२, रा. प्लाॅट नंबर १०७, इश्वर नगर, नई जिंदगी) याला बुधवारी मजरेवाडी चौकात पकडण्यात अाले आहे. त्याच्याकडून एक रिव्हाॅल्वर जप्त करण्यात आले अाहे.

शिवपुरे हा दिवसा बंद घरे हेरतो. रात्री साथीदारांच्या मदतीने काम फत्ते करतो. जुळे सोलापुरातील जनवाडकर पंढरपूर येथील मुधोळकर यांच्या घरात चोरी केल्याची कबुली त्याने दिली अाहे. सात तोळे दागिने, एक रिव्हाॅल्वर, एक दुचाकी (एमएच १३ एडब्लू ४५५४) जप्त करण्यात अाल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक बाळसाहेब शिंदे यांनी दिली. शिवाय चोरीचा एेवज घेतल्याप्रकरणी अस्लम मदार शेख (वय ३१, भवानी पेठ, सोलापूर) या सराफ दुकानदारालाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले.
परिमंडळ उपायुक्त पथकाने मागील पंधरवड्यात गोविंद नारायणकर या तरुणाला चोरी प्रकरणात अटक केली होती. या टोळीशी सुनील शिवपुरे याचे संबंध अाहेत. त्याच्याजवळ सापडलेले रिव्हाॅल्वर गोविंद नारायणकर यानेच दिल्याचे पोलिस तपासात समोर अाले अाहे. त्याची खातरजमा करण्यात येत अाहे.

या पथकाने केली कारवाई : सहायक निरीक्षक बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय कोळेकर, सहायक फौजदार अतुल न्यामणे, हवालदार संजय बायस, जयंत चवरे, अनिल वळसंगे, प्रशांत गाडे, मुन्ना शेख, सुभाष पवार, मंजूनाथ मुत्तनवार, धनंजय बाबर, सागर सरतापे, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे या पथकाने कारवाई केली.

पोलिसांनी अशी केली कारवाई
अक्कलकोट रस्त्यालगत एका हाॅटेलजवळ मनोज नावाचा तरुण रिव्हाॅल्वर विकण्यासाठी अाल्याची माहिती मिळाली होती. त्याला पकडल्यानंतर दोन रिव्हाॅल्वर सापडले. त्याच्या चौकशीत खैरमोडे या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे दोन रिव्हाॅल्वर मिळाले. बुधवारी शिवपुरे याच्याकडे एक रिव्हाॅल्वर मिळाले. मुळापर्यंत तपास करण्याची गरज अाहे. रिव्हाॅल्वर कुठून अाणले जाते, पुरवठा करणारा कोण अाहे, कुठल्या राज्यात, जिल्ह्यात याची विक्री होते का? याचा छडा लावला पाहिजे.
सोलापुरात पाच रिव्हाॅल्वर सापडले अाहेत. यांच्याकडे हे हत्यार कुठून अाले याचा शोध घेत अाहोत. आर्म्स अॅक्ट (२७) नुसार गुन्हे दाखल केले आहेत. वेळप्रसंगी परराज्यातही जाणार अाहोत. तपास किचकट असल्यामुळे घटनेची सत्यता पडताळून पुढील कारवाई करण्यात येईल. शंकर जिरगे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक
रिव्हाॅल्वर अथवा पिस्तुल बेकायदा जवळ बाळगणे, विक्री करण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्याअंतर्गत कारवाई झाल्यास अार्म्स अॅक्ट (२७) प्रमाणे सात वर्षे शिक्षा होऊ शकते. अॅड. प्रियल सारडा, मुंबई उच्च न्यायालयात वकिली
बातम्या आणखी आहेत...