आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SHOCKING: स्वत:च्या मुलासोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नीचा गळा चिरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- मुलांसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने पत्नीचा गळा चिरून खून केला. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास तिसंगी येथे ही घटना घडली. यात मुलानेच वडिलांनी आईचा खून केल्याची फिर्याद तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलाबाई शिवाजी भोसले (वय 42) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर शिवाजी नाथाजी भोसले (45) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी मुलगा राजकुमार (22) याने फिर्याद दिली. संशयित शिवाजी हा पत्नी कमलाबाई, मुलगा राजकुमार, दुसरा मुलगा नागेश (15) तिसंगीत राहतो. त्यांना तीन मुली असून, त्या विवाहित आहेत. शिवाजी हा नेहमी पत्नी कमलाबाईवर स्वत:च्याच मुलांसह इतरांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घ्यायचा. तसेच जीवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे कमलाबाई शिवाजी यांच्यात सतत भांडण होत असे.
बुधवारी दुपारी धाकटा मुलगा नागेश हा शाळेतून मधल्या सुटीमध्ये घरी परत आला. त्यावेळी घरासमोर वडील शिवाजी हे भेदरलेल्या अवस्थेमध्ये उभे असल्याचे दिसले. त्यांच्या कपड्यांवर रक्ताचे डागही होते. त्याला पाहाताच शिवाजी हा तेथून पळून गेला.
त्यानंतर नागेश हा घरात गेला असता त्याला आई कमलाबाई ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर त्याने त्वरित मोठा भाऊ राजकुमार याला फोनवरून आईच्या मृत्यूची माहिती दिली. त्यानंतर राजकुमार हा तेथे आला. त्याने वडील शिवाजी विरुद्ध खुनाची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित शिवाजीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे हे तपास करत आहेत.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...