आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर : ३६० आरोपी वाॅन्टेड, सुरूच आहे पोलिसांचा शोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - खून, मारामारी, घरफोडी, चोरी, अार्थिक फसवणूक आणि दरोडा आदी गुन्ह्यांतील अारोपी काही महिन्यांसाठी सोलापुरातून दुसरीकडे निघून जातात. पोलिस दोन-तीन महिने शोध घेतात. कालांतराने ही मोहीम थंडावते. पोलिसांच्या कामातही सातत्य राहत नाही. परिणामी अारोपीही सापडत नाहीत, असे चित्र दिसून येत आहे. पण, पोलिसांच्या मनात अाले तर अारोपींना शोधणे तसे अवघड काम नाही. फक्त पोलिसांनी मनावर घेऊन सक्षमपणे काम होणे गरजेचे अाहे.अाजच्या घडीला पोलिसांच्या रेकाॅर्डवर ८२ अारोपी फरार आहेत तर विविध गुन्ह्यातील ३६० अारोपी पोलिसांना सापडलेले नाहीत. विशेष बाब म्हणजे मागील नोव्हेंबर महिन्यापासून जून २०१६ या कालावधीत पोलिसांनी रेकाॅर्डवरील ८०० जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. यातील अनेक जण २० ते २५ वर्षांपासून फरार होते.
Áमागील नोव्हेंबर महिन्यापासून जून २०१६ या कालावधीत १२०० पैकी ८०० अारोपींना पकडले
Á यात पंचवीस ते तीस वर्षांपासूनचे अारोपी गायब होते.
Áयातील काही जणांचा मृत्यू झाला अाहे. तशी माहिती न्यायालयात कळवण्यात अाली.
Áकाही जण राज्याच्या बाहेर जाऊन राहत होते. त्यांना पकडून अाणले अाहे.
केसवर परिणाम नाही
सचिनकोळी, वकील
एखाद्या गुन्ह्यात अारोपींची संख्या जास्त असेल अाणि त्यातील काहीजण फरार असतील तर त्यामुळे केसवर शक्यतो परिणाम होत नाही. त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवून केस पुढे नेऊ शकतो. उर्वरीत अारोपींसाठी न्यायालयात अर्ज करून पोलिसांकडून अभिप्राय मागवला जातो आणि केस चालू ठेवली जाते. पोलिसांनी दक्षपणे काम केल्यास फरार आरोपींना पकडणे अवघड नाही.
पत्नीच्या खूनप्रकरणात डाॅ. प्रसन्ना अग्रहार तीन-चार महिन्यापासून गायब अाहेत. गुन्हे शाखेचे पथक तपास करत अाह.े तरीही डाॅक्टर सापडत नाहीत. रिद्धी -सिद्धी फायनान्समध्ये कोट्यवधी रुपयांना गंडवल्याप्रकरणी नागेश काटगावकर यांच्यावर गुन्हा दाखल अाहे. तोही अद्याप गायबच अाहेत. दहा महिन्यांपूर्वी अशोक चौकात दीड वर्षाच्या चिमुरड्या बालिकेचा खून करून पिता पळून गेला. घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात मुलीचा गळा दाबून तिला बांधकाम साइटवरील वाळूच्या ढिगाऱ्यात टाकला होता. तोही अद्याप जेल रोड पोलिसांना सापडलेला नाही.
पाहिजे अारोपी म्हणजे काय
एखाद्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर अारोपी जामीन घेतात. कालांतराने तारखेला न्यायालयात हजर राहत नाहीत. पोलिस तपास केल्यानंतर दोषारोपपत्र दाखल केल्यानंतरही अारोपी सापडत नाहीत. त्यामुळे खटल्याला विलंब होतो. अारोपींचा शोध घेण्यात येतो पण सापडत नाहीत. हे अारोपी पोलिसांच्या रेकाॅडॅवर पाहिजे अारोपी म्हणून येतात.
फरारअारोपी - गुन्हाघडल्यापासून अारोपी गायबच असतो. तपासात नाव पुढे अाले तरी सापडत नाहीत. त्यांना फरार अारोपी म्हणतात.
अाकडे बोलतात (पोलिस रेकाॅडवर)
पाहिजे अारोपी - ३६० फरार अारोपी - ८२
नागरिकांनी माहिती द्यावी, नाव गोपनीय ठेवू
पौर्णिमाचौगुले, पोलिसउपायुक्त, गुन्हे शाखा

पाहिजे फरार अारोपींची यादी अामच्याकडे असते. तपासासाठी खास तीन पथके अाहेत. अामचे पोलिस ट्रॅकवर असतात. मागील सात महिन्यात ८०० अारोपींना अटक झाली. अाता महत्वाच्या गुन्ह्यातील अारोपींना पकडण्यासाठी खास दोन पथके वाढवली. रेकाॅर्डवरील गुन्हेगार शेजारी-पाजारी येऊन राहत असेल तर अाम्हाला थेट संपर्क करा. नाव गोपनीय ठेवू. नागरिकांनी सपोर्ट केल्यास अारोपी सहज हाती लागू शकतो.
आपल्या प्रतिक्रिया: तुमच्यानावासह ९२०००१२३४५याक्रमांकावर एसएमएस करा
पॅरोलवर बाहेर आले, परत गेलेच नाही
तीन वर्षापूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात माजी नगरसेवक अनंत जाधव यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. कालांतराने पॅरोलवर बाहेर अाल्यानंतर ते पुन्हा कारागृहात गेलेच नाही. वाढदिवसासाठी भले मोठे फलकही लावले. पोलिसांना मात्र थांगपत्ताच नाही. सात-अाठ वर्षांपूर्वी तरटी नाका पोलिस चौकीजवळ तिहेरी खुनाची घटना घडली. त्यातील संशयितांचा शोधच लागला नाही. एका प्राध्यापकाने पतसंस्थेत पैसे गुंतवले होते. व्यवस्थापकाने पैशाचा अपहार केला. न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर संबंधित पतसंस्थेतील कर्मचारी गायब झाला. सुरुवातीला काही दिवस त्याने हजेरी लावली. नंतरच्या तारखेपासून म्हणजे दीडवर्षापासून तो पोलिसांना सापडलाच नाही.
बातम्या आणखी आहेत...