आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा सीमकार्ड विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- बेकायदेशीरपणे शहरात विविध कंपन्यांच्या सीमकार्डची विक्री करणाऱ्या सहा दुकानदारांवर दहशतवादविरोधी सेलने कारवाई केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १९) करण्यात आली असून जिल्ह्यात दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आल्यामुळे अशा कारवाया करण्यात येत आहेत.

दहशतवादी संघटना राज्यातील युवकांना आपल्या जाळ्यात ओढून कारवाया करत आहेत. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात यासंदर्भात सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात दक्षता घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पाहणी करीत असताना सीमकार्डची बेकायदेशीर नियमबाह्यरीत्या विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यानुसार शहरातील प्रमुख विक्रेत्यांची कसून चौकशी केली असता सहा जणांनी नियमबाह्यरीत्या सीमकार्डची विक्री केली असल्याचे निदर्शनास आले. शहरातील बसस्थानकासमोरील गणराज मोबाइल शॉपीचा चालक सौदागर अभिमान कदम (रा. शिवाजीनगर, उस्मानाबाद), जीत मल्टिसर्व्हिसेसचा चालक जितेंद्र बिट्टू पवार (रा. बामणी, ता. उस्मानाबाद), मेन रोडवरील कृष्णाई काॅम्पलेक्समधील दत्त मोबाइल शॉपीचा चालक वैभव दत्तात्रय पाटील (रा. माणिक चौक, उस्मानाबाद), शिवाजी चौकातील सिटी मोबाइलशॉपी चालक प्रकाश दुर्गाप्पा पवार (रा. शिवाजी चौक, उस्मानाबाद), तुळजापूर रस्त्यावरील न्यू रजवी फर्मचा चालक आरेफ माजीद रजवी (रा. गणेशनगर, उस्मानाबाद) खाजानगर येथील पटेल मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर्सचे शहानवाज पाशा पटेल (रा. खाजानगर, उस्मानाबाद) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या सहा जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

काळजी घ्यावी
जिल्ह्यातीलसीमकार्ड विक्रेत्यांनी ग्राहकांचे ओळखपत्र, निवासाचा पुरावा अन्य कागदपत्रे काळजीपूर्वक घेऊन त्याच ग्राहकाला कार्ड देणे गरजेचे आहे. तसेच याची नोंदही ठेवावी लागणार आहे. ग्राहकांनीही एक कार्ड घेण्यासाठी स्वत:च्या सहीने साक्षांकित केलेले एकच कागदपत्र देणे क्रमप्राप्त आहे. दोन प्रतीत कागदपत्र फोटो मागितले तर देण्यास नकार देण्याचे आवाहन दहशतवादविरोधी सेलने केले आहे.