आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस्त्याचे पैसे गेले रस्त्यावर, फिर्यादीच्या डोळ्यांत पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापुरात लग्नाच्या बस्त्याची खरेदी करण्यासाठी आलेल्या एका महिलेकडील जवळपास लाख १० हजार रुपये लंपास झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी अंबुरे या रडूनरडून आपली कहाणी सांगत होत्या.

याची माहिती अशी की, यशोदा मनोहर अंबुरे (वय ४२, रा. इचगाव, ता. मोहोळ) या दुपारच्या सत्रात घरातील एका लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सोलापुरात आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाइक लक्ष्मीबाई सखाराम गायकवाड (मामी, रा. अशोक चौक), कविता मल्लिकार्जुन घुले (जाऊ), कलावती माेहन चव्हाण, आबा सखारात घुले (वय २७, सर्वजण राहणार देगाव नाका) हे होते. सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास भांडे गल्लीतील माशाळ या भांडे दुकानाजवळ ते खरेदी केलेल्या भांड्यावर नावे टाकत बसले होते. यावेळी यशोदा यांच्याजवळ तब्बल लाख १० हजार रकमेची असलेली कॅरिबॅग लंपास झाली आहे. यशोदा त्यांच्याजवळची पिशवी अचानक गडप झाल्याने भांबावल्या. त्यांना पोलिसांकरवी जुनी फौजदार चावडी येथे आणण्यात आले. परंतु त्यांच्याकडून चोराने पैसे लंपास केले की खरेदीच्या घाई गर्दीमध्ये ती पिशवी कोठे पडली याचा अजून पत्ता लागला नाही. पोलिस तपास करीत आहेत, एक डॉगस्कॉडही बोलाविण्यात आले. गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे, सहायक पोलिस आयुक्त एस. एस. नेवे, अधिकारी यशवंत शिर्के पोलिस पथक दाखल झाले. अजून या प्रकरणाचा गुन्हा नाेंदविण्याचे काम जोडभावी पोलिस ठाण्यात सुरू आहे. याप्रकरणी दोघांना त्वरित चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

भांडे गल्ली येथे घडलेल्या चोरीप्रकरणी संबंधित महिलेकडून मािहती घेताना पोलिस उपायुक्त अपर्णा गीते सहाय्यक आयुक्त शर्मिष्ठा घारगे.