आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुटीसाठी प्रवाशाला पाइपने केली मारहाण, जखमीवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशास लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना २२ जून रोजी घडली. त्याच्या डोक्यावर लोखंडी पाइपने मारहाण केल्याने तो जखमी झाला असून, सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्र एक्स्प्रेसने जात असलेल्या अविनाश मोहन पाटील रा. फतेपूर, ता. जामनेर, जि. जळगाव यांच्या डोक्यावर दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास दाेघांनी लोखंडी पाइपने मारहाण करण्यात आली. त्यांच्याजवळील मोबाइल पैसे लुटण्याचा प्रयत्न या वेळी केला. या घटनेत त्यांचा तोल जाऊन ते रेल्वेतून खाली पडले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्यास सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. अपघात कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबद्दल रेल्वे स्टेशन परिसरात मात्र खून झाल्याची अफवा पसरली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण, रामदासपेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुभाष माकोडे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावकार यांच्यासह पोलिस बिर्ला गेट परिसरात पोहोचले. बिर्ला गेट ते तारफैलपर्यंतचा संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढला. मात्र, खून झालेला किंवा जखमी व्यक्ती पोलिसांना आढळून आला नाही. रुग्णालय रेल्वे पोलिसांशी संपर्क केल्यानंतर खुनाची कोणतीही घटना नसल्याचे निष्पन्न झाले.

खून झाल्याची पसरली हाेती अफवा
प्रवाशावरील हल्ल्याच्या घटनेनंतर खूनाची अफवा पसरली. सोशल मीडियावरही त्याचा प्रसार झाला. मात्र, रेल्वे पोलिसांसह रामदासपेठ पोलिस तसेच उपविभागीय अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी परिस्थिततीवर नियंत्रण मिळवत ही अफवा असल्याचे सांगितले.
पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
बातम्या आणखी आहेत...