आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या घटनेतील ट्रॅक्टर जाळले, गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा- गाळवाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरने एका बैलगाडीला फरपटत नेल्यामुळे, त्या बैलगाडीत खेळत असलेल्या एका चिमुकलीचा मृत्यू, तर दुसरी गंभीर जखमी झाली होती. ही घटना शनिवारी दुपारी सिंदखेडराजा शिवारात घडली होती. दरम्यान, या घटनेतील ट्रॅक्टर त्याच रात्री जाळण्यात आले. या प्रकरणी ट्रॅक्टरमालकाच्या फिर्यादीवरुन सिंदखेडराजा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गाळ वाहून नेऊन शेतात टाकणाऱ्या एका विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरने बैलगाडीला धडक देऊन फरपटत नेले. त्यामुळे बैलगाडीत खेळणाऱ्या मीरा काशिनाथ वाघ (वय ८) हिचा मृत्यू, तर वैष्णवी अर्जुन पानझडे (वय १०) ही गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजता सिंदखेडराजा शिवारात घडली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली होती.

दरम्यान, पाऊस पडत असल्यामुळे या घटनेतील ट्रॅक्टर पोलिसांनी पोलिस स्टेशनला घेऊन जाता आले नाहीत. त्यामुळे घटनास्थळीच उभ्या असलेल्या या ट्रॅक्टरला त्याच रात्री ११ ते ११.३० वाजता जाळून टाकण्यात आले. या प्रकरणी ट्रॅक्टरमालक शे. यासिन शे. नूरखाँ यांच्या तक्रारीवरून आरोपी मसाजी बबन तांबेकर सुरेश बबन तांबेकर या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सिंदखेडराजा पोलिस करत आहेत.
त्या घटनेतील ट्रॅक्टर जाळले
बातम्या आणखी आहेत...