आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीची एक लाख रुपयांत विक्री करणाऱ्या फरार आरोपीस अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव- एका युवतीला एक लाख रुपयांत विकून तिचे लग्न लावून फरार झालेल्या दोन आरोपींना रतलाम पोलिसांनी खामगाव शहर पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी केली.

खामगाव तालुक्यातील अासा दुधा येथील रहिवासी देवानंद गवई बुलडाणा येथील नितीन साळुंके हे दोघे कामासाठी मध्य प्रदेशातील रतलाम येथे गेले होते. दरम्यान, काम करत असताना त्यांची एका युवतीसोबत ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेऊन त्यांनी या युवतीला त्याच गावातील राकेश राठोडला एक लाखांत विकून तिचे त्याच्यासोबत लग्न लावून दिले. त्यानंतर ती युवती काही दिवस पतीच्या घरी राहिली. नंतर तिने पतीला चकमा देत तेथून पलायन केले. ही बाब राठोड यांच्या लक्षात येताच त्यांनी रतलाम पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी देवानंद गवई नितीन साळुंके याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
१५ जूनला रतलाम पोलिस आरोपीच्या शोधार्थ खामगाव शहरात येऊन ठाणेदार ढाकणे यांच्या मदतीने आरोपींना अटक करून रतलाम येथे घेऊन गेले.