आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंडा हाणामारीप्रकरणी सहाजणांना कोठडी, २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा- मिरवणुकीदरम्यान सोमवारी (दि.१८) रात्री दोन गटात झालेल्या हाणामारीत परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाजणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता २० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शहरात सुफी संत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन चिश्ती यांचा उरुस सुरू झाला आहे. सोमवारी फुलांची मानाची चादर मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी हाणामारी करून बॅनर फाडण्यात आले. याप्रकरणी २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, आसीफ शेख, अजहर शेख, जुबेर सौदागर, करीम सौदागर, शहाबाज सौदागर, मोहसीन सौदागर यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.