आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या अपहरणप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- उस्मानाबादेत काकांकडे आलेल्या निलंगा तालुक्यातील एका मुलीचे गावातीलच तरुणाने नातलगांच्या मदतीने अपहरण केले. ही घटना दि. एप्रिल रोजी वाजेच्या सुमारास उस्मानाबादेतील आदर्शनगर येथे घडली.

निलंगा तालुक्यातील हत्तरगा येथील मुलगी सुटीच्या कालावधीत क्लासेससाठी उस्मानाबाद येथे काकांकडे राहण्यास आली होती. परंतु, सदरील मुलगी दि. एप्रिलपासून बेपत्ता होती. याबाबत मिसिंगचीही तक्रार यापूर्वी देण्यात आली होती. दरम्यान, आपल्या मुलीला हत्तरगा येथीलच नितीन जाधव, छायाबाई जाधव, सचिन जाधव, सौदागर बरमदे, देवीदास जाधव, गणपती बरमदे यांनी पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली. त्यानुसार वरील सहा अारोपींविरोधात आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.