आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनी हल्ला: भांगे- डोंगरे यांच्या गटातील राजकीय वैमनस्यातून हल्ला,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर / मोहोळ /मोडनिंब- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यावर शेटफळ गावात तेरा जणांच्या गटाने तलवार, गज, लोखंडी गजाने हल्ला केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून पुढील ४८ तास त्यांच्यासाठी महत्त्वाचे अाहेत. गावातील भांगे आिण डोंगरे गटातील राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा अंदाज आहे.

अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असून नऊ डॉक्टरांचे पथक काम करीत अाहे. चेहऱ्यावरील काही जखमांना प्लास्टिक सर्जरी करण्यात अाल्या अाहेत. काही लहान शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. रक्तस्त्राव थांबला असून प्रकृतीत किंचित सुधार अाहे. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे हाॅस्पिटल प्रशासनाने सांगितले.

विजयराजयांच्यासह भावंडांची घालमेल : डोंगरेयांना भेटण्यासाठी रुग्णालयात जिल्ह्यातील नेते, अामदार, पदाधिकारी, विविध पक्षाचे नेते येत होते. प्रकृतीबाबत विजयराज डोंगरे यांच्याकडे चौकशी करत होते. बाबांवर झालेला हल्ला, परिवारावर अालेली अापत्ती विजयराज यांच्या चेहऱ्यावर जाणवत होती. सगळ्या भावंडांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. तरीही संयमपणे ते सर्वांना बोलून माहिती सांगत होते.

मोहोळ पोलिसांकडे गुन्हा वर्ग झाला. मध्यस्थी करणाऱ्या राजेंद्र पांढरे, रमेश कुंडलिक भांगे त्यांच्यावरही हल्ला झाला. पोलिस निरीक्षक सूरज बंडगर तपास करीत अाहेत.
मोडनिंब येथील हिंदवी बिअर शाॅपीवर सकाळी बाराच्या सुमाराला दगडफेक झाली. शेटफळ येथील संग्राम भांगे, हनुमंत कसबे यांच्या पानटपरीवर हल्ला झाला. निखील कसबे यांची कार जाळली. मुख्य महामार्गावर रास्ता रोको करण्यात अाला. काहींच्या हाती तलवारी होत्या.
पुढीस स्लाइड्सवर वाचा काय आहे राजकीय वैमनस्य?