आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहित महिलेची आत्महत्या, दोघांना अटक; चौघांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दहा लाख रुपयांसाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून कविता कपिल अवस्थी (वय २९, रा. जुनी पोलिस लाइन, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी अात्महत्या केल्याप्रकरणी पतीसह दोघांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली अाहे.

शंकर जहागीरदार (रा. बागलकोट) यांनी फिर्याद दिली अाहे. पती कपिल अवस्थी, अाशिष दीपक अवस्थी या दोघांना शुक्रवारी अटक झाली अाहे. कल्पना दीपक अवस्थी, रूपा अाशिष अवस्थी (रा. सर्व जण जुनी पोलिस लाइन) राजेश अवस्थी (रा. सुपर मार्केट) यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. कविता कपील यांचा विवाह मागील तीन महिन्यांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात झाला होता.

दोन दिवसानंतर लगेच कुरिअरच्या व्यवसायासाठी दहा लाख रुपये अाण म्हणून छळ सुरू झाला. शिवीगाळ दमदाटी करून मानसिक शारीरिक छळ सुरू होता. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमाराला घरात साडीने गळफास घेऊन कविताने अात्महत्या केली. कविताला सासरकडील लोकांनी जीवे मारून अात्महत्या केल्याचा बनाव केल्याची फिर्याद देण्यात अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...