सोलापूर- शनिवारी पहाटे तीनच्या सुमाराला चौघे चोर हाॅटेल यश पॅलेसमध्ये अाले. दारावर लावलेल्या मारुतीच्या फोटोला पाया पडले अन् दोघे शटर वाकवून खाली वीट लावून अात शिरले. तर काऊंटर दिसला. गल्ला उचकटून दहा हजाराचे बंडल हाती लागताच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. सुमारे १८ हजार रुपये काढल्यानंतर तिघांनी पैसे वाटून घेतले. बाहेर जाताना रेड बुल एनर्जी ड्रिंक रिचवली. हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.
महापौर बंगल्याजवळील हाॅटेल यश पॅलेसमध्ये चोरीचा हा प्रकार घडला. पहाटे तीनला प्रभाकर गौडनवरू यांना फोन अाला. अापल्या हाॅटेलात चोरी झाली असून चोरांना पकडून ठेवले अाहे. लागलीच ते अाले. हाॅटेल उघडून पाहिले असता कुठल्याही वस्तूला हात लावला नाही. फक्त गल्ल्याचा ड्राॅवर उचकटल्याचे दिसले. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर चोरीचे चित्रण दिसले.
राजकुमार व्यंकटेश कुमार (रा. कोळीवाडा, माहीम, मूळ कनाॅटक), विकी सुरेश वाघमारे (रा. कोळीवाडा माहीम), मित्र बहादूर क्षत्री (माहीम, अासाम) या तिघांना अटक असून २१ जूनपयॅंत पोलिस कोठडी मिळाली अाहे. सद्दाम हुसेन उर्फ छोटू (रा. बिहार) हा पळून गेला. सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला अाहे.
एकफुटातून चोरटे अात गेले :दोघांनी शटर वाकवून त्याला विटाचा अाधार दिला. त्यातून तिघे अात अाले. एकजण गल्ला फोडत होता. दुसरा बाजूला थांबला होता. पैशाचे बंडल हाती लागल्यामुळे अानंदले. अाणखी एकजण मोबाइल बॅटरीच्या प्रकाशात गल्ल्यातील अाणखी पैसे शोधू लागला. दोन पिशव्यांमध्ये ठेवलेले पैसे हाती लागले. तिघे थोडे-थोडे पैसे खिशात घालून बाहेर पडले. अवघ्या दहा मिनिटांत १८ हजार रुपये एक मोबाइल पळवला. जाताना पुन्हा फ्रीजमधील रेड बुल एनर्जी ड्रिंक पिऊन गेले. दहा मिनिटांत चोरी करून दमल्यामुळे जणू शक्ती मिळावी म्हणून ड्रिंकवरच ताव मारला.
चौकशीत अजून सत्य बाहेर येईल
तिघांची अजून चौकशी सुरू अाहे. ते रेकाॅर्डवरील अाहेत की कसे हे अजून कळले नाही. काल रात्री सोलापुरात मुंबईहून अाले. पैशाची गरज भूक लागल्याने चोरी केल्याचे ते सांगतात. तिघांकडून चौकशी सुरू असून ते माहीममध्ये राहतात एवढेच सांगतात. या हाॅटेलपासून जवळ असलेल्या रेल्वे काॅलनीतील मोकळ्या मैदानात बसून पैसे वाटून घेत होते. त्यावेळी दोघा तरुणांनी त्यांना पकडून ठेवले. एकजण पळून गेला. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करत असून सत्य बाहेर येईल. पौर्णिमा चौगुले, पोलिसउपायुक्त गुन्हे शाखा
सद्दामहुसेन उफॅ छोटू (रा. बिहार) हा पळून गेला. सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला अाहे.
एकफुटातून चोरटे अात गेले :दोघांनी शटर वाकवून त्याला विटाचा अाधार दिला. त्यातून तिघे अात अाले. एकजण गल्ला फोडत होता. दुसरा बाजूला थांबला होता. पैशाचे बंडल हाती लागल्यामुळे अानंदले. अाणखी एकजण मोबाइल बॅटरीच्या प्रकाशात गल्ल्यातील अाणखी पैसे शोधू लागला. दोन पिशव्यांमध्ये ठेवलेले पैसे हाती लागले. तिघे थोडे-थोडे पैसे खिशात घालून बाहेर पडले. अवघ्या दहा मिनिटात १८ हजार रुपये एक मोबाइल पळविला. जाताना पुन्हा फ्रीजमधील रेड बुल एनर्जी ड्रिंक पिऊन गेले. दहा मिनिटात चोरी करून दमल्यामुळे जणू शक्ती मिळावी म्हणून ड्रिंकवरच ताव मारला.
चौकशीतअजून सत्य बाहेर येईल
तिघांची अजूनचौकशी सुरू अाहे. ते रेकाॅडवरील अाहेत की कसे हे अजून कळले नाही. काल रात्री सोलापुरात मुंबईहून अाले. पैशाची गरज भूमक लागल्यामुळे चोरी केल्याचे ते सांगतात. तिघांकडून चौकशी सुरू असून ते माहीममध्ये राहतात एवढेच सांगतात. या हाॅटेलपासून जवळ असलेल्या रेल्वे काॅलनीतील मोकळया मैदानात बसून पैसे वाटून घेत होते. त्यावेळी दोघा तरूणांनी त्यांना पकडून ठेवले. एकजण पळून गेला. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करीत असून सत्य बाहेर येईल. पौणिॅमा चौगुले, पोलिसउपायुक्त गुन्हे शाखा
सीसीटीव्हीत कैद झालेली चोरांची छबी.
बँकेला सुटी असल्यामुळे सुटे पैसे ठेवले होते
तीन वर्षांपासूनहाॅटेल सुरू अाहे. शनिवारी रविवारी बँकेला सुटी असते. दहा पन्नास रुपयांच्या नोटा सुटे लागतात म्हणून गल्ल्यात काल रात्री ठेवलो होतो. पहिल्यांदाच असा प्रकार घडला अाहे. फक्त पैसे नेले. देवासमोरील गल्लाही नेलाय. मोबाइल नेला होता. तो पोलिसांना सापडला. चौघांपैकी एकजण पळून गेला असून तिघेजण पोलिसांना साडपले अाहेत. पळून गेलेलाच पैसे घेऊन गेला अाहे.” प्रभाकर गौडनवरू, हाॅटेलयश पॅलेस, चालक