आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी परिसरात दगडफेक, ११ जण २९पर्यंत स्थानबद्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मोदी परिसरात बुधवारी सायंकाळी पानटपरीवर बिल देण्याच्या कारणावरून झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी अकरा जणांना अटक करून गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना २९ जूनपर्यंत स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश दिले.
नरेंद्र ऊर्फ नाना हणमंतू म्हेत्रे (वय ३८, रा. मोदी), यल्लप्पा नरसप्पा कमलापूर (४२, रा. मोदी), श्रीनिवास हणमंतू वाकीतोळू (वय ४०, रा. मोदी), नरेश सायबल्लू म्हेत्रे (वय २५, रा. मोदी), विलास अगस्टीन नाईक (वय १९, रा. मोदी), रतिकांत कमलापूर (वय २६, रा. मोदी), नरसिम्हा नरसिंह म्हेत्रे (वय २४, रा. मोदी), मयूर सायबण्णा गाठे (वय २५, रा. मोदी), लक्ष्मण हणमंतू झंगडेकर (वय २८, रा. मोदी), बाबू जंगलप्पा गुदपे (वय २४, रा. मोदी), अजय नागनाथ किंदगिरी (वय २८, रा. मोदी) या अकरा जणांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकरणी मूळ फिर्यादीकडून अॅड. रियाज शेख, आरोपीकडून अॅड. अजमोद्दीन शेख यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...