आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेचा छळ, चौघांविरुद्ध गुन्हा- माहेरहून आठ लाख रुपये आणण्याचा तगादा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - माहेरहून आठ लाख रुपये आणण्याचा तगादा लावून शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या चौघाजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इसलामुनीसा अल्तमश कादरी (वय २२, रा. गुरुवार पेठ) या विवाहितेला पैशाचा कारणावरून नेहमी शारीरिक मानसिक छळ केल्याची घटना मे २०१६ रोजी घडली. याबाबत २२ जून रोजी रात्री विवाहितेने जेलरोड पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली. अल्तमश कौसरहुसेन कादरी, जिनत कौसरहुसेन कादरी, कौसर हुसेन कादरी, डॉ. शाहरुख कौसरहुसेन कादरींविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

घरगुती गॅसचा गैरवापर
जुनादेगाव नाका, थोबडे वस्ती येथे घरगुती गॅसचा वापर इंधर म्हणून इतर वाहनामध्ये भरत असताना पुरवठा विभाग आणि पोलिसांनी आरोपीसह २६ हजारांचा ऐवज ताब्यात घेतला. हा प्रकार २१ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी पुरवठा अधिकारी संध्या बाळासाहेब सोनवणे यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून रज्जाक गफूर शेख (वय ३५, रा. थोबडेवस्ती) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारच्या धडकेत एक जखमी
सातरस्ता इंडिया कॅन्टीन समोर २२ जून रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुबारक बेगडे याने कार (एमएच ४५, एन ०१३२) ने अजय यादव आणि यशवंत कोळी यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. याप्रकरणी अजय सुरेश यादव (वय ३५, रा. एनजी मिल मुरारजी पेठ) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून मुबारक बेगडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जावरून मारहाण
व्याजानेघेतलेले सत्तर हजार रुपये परत देत नाही, असा जाब विचारत लक्ष्मीकांत उघडे, प्रशांत बाबरे इतर दोघांनी मिळून नितीन नामदेव शिरसट यास गळा दाबून अंगावर रॉकेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद नितीन शिरसट यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. यावरून चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार २२ जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला.
बातम्या आणखी आहेत...