आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहित महिलेवर दुष्कर्म, भोंदूबाबास सात वर्षे सक्तमजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- एका विवाहित महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी एका भोंदूबाबाला सातवर्षे सक्तमजुरीची शिक्षा मुख्य जिल्हा न्यायाधीश विभा कंकणवाडी यांनी सुनावली. विशेष म्हणजे दोघांच्या संबंधातून जन्मलेल्या बाळाला महिन्याकाठी अारोपीने साडेसातशे रुपये पोटगी द्यावी, असा अादेश अाहेत. नरसिंग नरसप्पा तंतलकर (वय ४७, रा. थोरली इरण्णा वस्ती, सोलापूर) याला शिक्षा झाली अाहे. याबाबत पीडित महिलेने सदर बझार पोलिसात तक्रार दिली होती.

पीडित महिलेचा पतीसोबत वाद झाल्यामुळे ती अाईकडेच बारा वर्षांपासून राहत होती. परिसरातच नागोबा मंदिर अाहे. त्या मंदिरात नरसिंग बसायचा. धुणी-भांडी करण्यासाठी महिला नेहमी त्या रस्त्यावरून ये-जा करीत होती. एकेदिवशी त्यांचा हात पाहून तुला सासूने करणी केली अाहे. ती करणी काढतो. तुझा संसार चांगला उभा करतो. तुला नवऱ्याकडे नांदवायला पाठवितो. हा माझा अाशीर्वाद अाहे असे म्हणत बाटलीत ठेवलेल्या पाण्यावर मंत्र घालून प्यायला दिला. काही वेळाने उर्वरितपान

तिच्यासोबत दुष्कर्म केला. यातून ती महिला गरोदर राहिली. २३ फेब्रुवारी २०१४ रोजी मुलीला जन्म दिला. १२ फेब्रुवारी २०१४ रोजी तक्रार देण्यात अाली.

नरबळीअमानुष अघोरी प्रथा कलमांतगर्गंत कारवाई : भोंदूबाबानरसिंग तंतलकर याच्यावर कलम ३७६ अाणि महाराष्ट्र नरबळी अाणि नरबळी अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक करण्याबाबत त्याच्या सूमळ उच्चाटन करण्याकरिता अध्यादेश सन २०१३ चे कलम तीन प्रमाणे गुन्हा नोंदवून अारोपपत्र दाखल करण्यात अाले होते. या खटल्यात सात साक्षीदार तपासण्यात अाले. पाच पोलिस, फियाॅदी, अाई यांची साक्ष नोंदण्यात अाली.

मुलाचीडीएनए चाचणी झाली होती : याखटल्यातील पिडीत महिला त्यांची अाई दोघेही खटल्याची सुनावणी सुरू असताना फितूर झाले होते. दोघांच्या शारिरिक संबंधातून जे बाळ जन्माला अाले होते त्याबाळाची डीएनए चाचणी झाली होती. चाचणीत अारोपी पिडीत महिलाच बाळाचे अाई-वडील असल्याचे निष्पन झाले होते. सरकारी वकील अॅड प्रदीपसिंग रजपूत यांनी केलेला युक्त्तीवाद सादर केलेले न्यायनिवाडे ग्राहय धरण्यात अाले. अारोपीतफॅ अॅड अाजमोद्दीन शेख यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...