आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅरिबॅगेत मृत पुरुष जातीचे अर्भक, उत्तर कसबामध्ये सकाळी निदर्शनास आला प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य उत्तर कसबा येथे बुधवारी सकाळी समोर आले. पुरुष जातीचे अर्भक मुंग्या लागलेल्या अवस्थेत कॅरिबॅगमध्ये आढळून आले. मन हेलावणारे हे दृष्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आले. पोलिसांनी ते मृतदेह ताब्यात घेतले.

हे मृत अर्भक बुधवारी सकाळी तेथील महिलांच्या नजरेस पडले. या लोकांनी हे वृत्त फौजदार चावडी पोलिसांना कळविले. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. ते मृत अर्भक ताब्यात घेऊन पोलिसांनी शासकीय रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या बाबत फौजदार चावडी पाेलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून शोध सुरू आहे.

गजबजलेल्या परिसरात प्रकार
उत्तरकसबा म्हणजे नेहमी गजबजलेला परिसर. मध्यरात्रीपर्यंतही येथील कट्ट्यावर गप्पे रंगवणारी मंडळी असते. अशा परिस्थितीत उत्तर कसबा सवार गल्ली, कृष्ण मंदिरजवळ, रस्त्याच्या कडेला ते मृत अर्भक टाकण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...