आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीमध्ये सराफाला लुटण्याचा प्रयत्न करणारे आणखी दोघे जेरबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- एसटीबसमध्ये सराफाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. अक्कलकोट ते हैद्रा या मार्गावर एसटीत चाकू अाणि पिस्तुलचा धाक दाखवून एका टोळीने दागिने लुटण्याचा प्रयत्न ऑगस्ट २०१६ रोजी केला होता. या प्रकरणी ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसांपूर्वी दोघांना अटक केली होती. गुरुवारी आणखी दोन आरोपींना पिस्तूलसह ताब्यात घेण्यात आले. मुदकण्णा आणि दिलीप अशी दोघांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी सहायक पोलिस निरीक्षक उमेश धुमाळ त्यांचे पथक इंडी, सिंदगी या भागात रवाना केले होते. मुदकण्णा आणि दिलीप हे दोघे गावातून पळून जाण्यासाठी सिंदगी एसटी स्टॅँड येथे येणार असल्याची माहिती श्री. धुमाळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून दोन्ही संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी बसमधून जाणाऱ्या सराफास लुटण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील आरोपी दिलीप शरणप्पा हरिजन (वय २०, रा. हच्चाळ, सिंदगी) याने एसटी बसच्या चालकास कानपट्टीजवळ देशी बनावटीचे पिस्तूल लावून बस थांबवण्यास भाग पाडले. तर लगमण्णा ऊर्फ मुदकप्पा ऊर्फ जंगली केंचप्पा पुजारी (वय २१, रा. हच्चाळ, सिंदगी) याने बसमधील प्रवाशांना दमदाटी, अडवणूक केल्याचे मान्य केले. पोलिसांनी पुजारी याच्या कब्जातून पंचवीस हजार किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले.

यांचे होते पथक
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक उमेश धुमाळ, नारायण गोलेकर, विजयकुमार भरले, मोहन मनसावाले, व्यंकटेश मोरे, अासिफ शेख, सागर शिंदे, सचिन गायकवाड, अमोल गावडे, चालक दीपक जाधव, राहुल सुरवसे यांनी पार पाडली.
बातम्या आणखी आहेत...