आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचा खून करून मृतदेह तलावात फेकला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येरमाळा- कळंब तालुक्यातील येरमाळा घाटाच्या परिसरात काेरड्या पाझर तलावात २५ ते ३० वर्षीय महिलेचा खून करून तिच्या शरीरावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिची ओळख पटणार नाही आणि पुरावा नष्ट करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी (दि.२०) सकाळी १० वाजेच्या सुमारास येरमाळा-बार्शी मार्गावर उघडकीला आली असून सदरील महिलेवर अतिप्रसंग करून तिचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
माहिती मिळताच येरमाळा पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे यांनीही घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. सदरील महिलेच्या चेहऱ्यावर दगडाने मारहाण केल्याच्या जखमा तसेच ज्वलनशील पदार्थामुळे शरीरावर जागोजागी जळाल्याच्या खुणा दिसत होत्या. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल किसन मुंढे यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदरील महिलेची ओळख पटवून पुन्हा आरोपींपर्यंत पोहोचण्याचे मोठे अाव्हान पोलिसांसमोर असून याप्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
बातम्या आणखी आहेत...