आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीस पळविले, वडिलांनी झाडल्या प्रियकरावर गाेळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अापल्या मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरुन तिच्या प्रियकरावर मुलीच्या वडिलाने (निवृत्त सैनिक) त्याच्या आई, बहीण, भावासमोर दोन गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी त्याच्या जबड्यातून आणि दुसरी पायातून गेली. ही घटना शनिवारी रात्री घोंगडेवस्तीत घडली. दरम्यान, मुलीच्या वडिलास पोलिसांनी अटक केली.

विनायक शिवानंद हुबळीमठ (१७, रा. घोंगडेवस्ती, भवानी पेठ, सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे, तर अाराेपी बसवराज धोडिंबा चौगुले यांच्यासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाची अाई नम्रता शिवानंद हुबळीमठ यांनी फिर्याद दिली आहे. जखमी विनायक हा वैराग येथे इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या द्वितीय वर्षाला आहे. त्याचे दहावीपासून चौगुलेच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. १९ जुलै रोजी दोघेही पुण्याला पळून गेले. शोध घेऊन दाेघांना सोलापुरात आणल्यानंतर मुलीला पोलिसांनी पालकाच्या स्वाधीन केले. मात्र त्यानंतर संतप्त चौगुलेने विनायकच्या घरी जाऊन त्याच्यावर त्याला बाहेर बाेलावले व गाेळ्या झाडल्या.