आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॅरोलवरील जन्मठेप कैदी फरारच, वाढदिवसाचे मात्र झळकले फलक,दोन वर्षांपासून शोध सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- खूनप्रकरणात शिक्षा लागल्यानंतर पॅरोलवर तुरुंगाबाहेर येऊन फरार झालेला भाजपचा माजी नगरसेवक अनंत जाधव याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा वाढदिवस जल्लोषात केला. विशेष म्हणजे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे खासदार शरद बनसोडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजप प्रभारी सुजित ठाकूर, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी आदींच्या छबीसह त्याची छबी असलेले डिजिटल फलकही लावण्यात आले. कारागृहाने फरार असल्याची तक्रार िदली असून पोलिस त्याचा शोध घेत अाहेत. सत्ताधारी असलेल्या आणि शिस्तीची प्रतिमा मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या एका माजी नगरसेवक समर्थकांचे धाडस धक्कादायक अाहे. २०१२ मध्ये झालेल्या पालिका नवडणुकीतअनंत जाधव भारतीय जनता पक्षातर्फे निवडून अाला. त्यानंतर एका खून प्रकरणात त्यांच्यावर न्यायालयात खटला चालला. न्यायालयाने दोषी धरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. कारागृहात असतानाच नातेवाईकाचे निधन झाल्याने त्याला रजा देण्यात अाली. दीड वर्षापूर्वी तो कारागृहातून बाहेर पडला. पण अजूनही कारागृहात पोहोचला नाही. त्यामुळे पुण्यातील कारागृह पोलिसांनी सोलापुरात येऊन तक्रार दाखल केली. तेव्हापासून सोलापूरचे स्थानिक पोलिस त्याचा शोध घेत अाहेत. मिळालेल्या माहितीनुसार तो शहराच्या पश्चिम भागातच वास्तव्यास अाहे. तो निवडून अालेल्या प्रभागातच त्याचे डिजिटल फलके झळकली अाहेत.

एकीकडे पोलिस शोध घेत असताना दुसरीकडे स्वत: अारोपीच अाज अापला वाढदिवस जल्लोषात साजरा करीत अाहे. भवानी पेठेत त्याचे डिजिटल फलके झळकली अाहेत. त्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते, खासदार, पालकमंत्री अादींच्या छबी अाहेत.

शिक्षेनंतरपद झाले रद्द
अनंतजाधव हा भाजपचा कार्यकर्ता होता. प्रभाग क्रमांक मधून नरसूबाई गदवालकर सोबत द्वि प्रभाग पद्धतीत निवडून आला होता. त्यानंतर त्यास जन्मठेपेची शिक्षा झाली. ते भाेगत असताना सुटीवर आला. दरम्यानच्या कालावधीत महापालिका सभागृहात हजर होता. पुन्हा वारंवार गैरहजर राहिल्याने तत्कालीन मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द केले.

पक्षाचा तो प्राथमिक सदस्यही नाही
अनंत जाधवहे भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्य नाहीत. मागील काळात सदस्य होते. नवीन नोंदणीत जाधव यांचे नाव नाही. फोटो वापरल्याची माहिती नव्हती. नंतर कळाले.” प्रा.अशोक निंबर्गी, भाजपा शहरध्यक्ष

३० एप्रिल रोजी लागला निकाल
मराठावस्तीत राहणाऱ्या एका तरुणाचा जून २००९ रोजी खून झाला होता. त्यात अनंत जाधवसह सातजणांवर गुन्हा दाखल झाला होता. तीस एप्रिल २०१२ रोजी जाधव यांच्यासह दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात अाली अाहे. पाच जणांना निर्दोष सोडण्यात अाले. पॅरोलवर बाहेर अाल्यापासून तो गायबच अाहे. याबाबत अाज पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांना विचारले असता, कारागृह विभागाने जर फरार असल्याची फिर्याद दिली असेल तर अामच्याकडे ती पाहिजे आणि फरार अारोपी यादीत त्याचे नाव अाहे का ते तपासून पाहूयात. मंगळवारी ती यादी तपासून नेमका प्रकार पाहावा लागेल. जर पाहिजे असलेल्या अारोपींच्या यादीत नाव असेल तर खास पथके नेमून तपास करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...