Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | criticism of MLA Praniti Shinde on modi government

भाजपची राजवट फक्त झोल अन् सबकुछ गोल; आमदार प्रणिती शिंदे यांची टीका

प्रतिनिधी | Update - Oct 12, 2017, 10:38 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणबाजी नुसता झोल असून भाजपचा कारभार सबकुछ गोलमाल अाहे. सत्ताधारी विकृत मनोवृत्तीचे असून

 • criticism of MLA Praniti Shinde on modi government
  सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणबाजी नुसता झोल असून भाजपचा कारभार सबकुछ गोलमाल अाहे. सत्ताधारी विकृत मनोवृत्तीचे असून स्वच्छ भारत पेक्षाही स्वत:ची मने अगोदर स्वच्छ करावीत. भूलथापा मारून भाजपने महापालिकेची सत्ता मिळवली. पण, नगरसेविकांना विकासकामांसाठी निधी देता येईना, कर्जमाफीच्या नावाखाली राज्यात शेतकऱ्यांची दिशाभूल, महागाई-जीएसटी अन् नोटबंदीमुळे जनता त्रस्त झाली असून भाजपच्या पापांचा घडा भरत आलाय, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.

  शहर जिल्हा काँग्रेसतर्फे बुधवारी (दि. ११) महापालिका, राज्यशासन केंद्राच्या कार्यपद्धतीच्या विरोधात भव्य जनआक्रोश धडक मोर्चा महापालिकेवर काढण्यात आला. दुपारी तीन वाजता काँग्रेस भवन येथून निघालेल्या मोर्चात शहराध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, महापालिका गटनेते चेतन नरोटे, प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, यू. एन. बेरिया, रियाज हुंडेकरी, नगरसेविक बाबा मिस्त्री, फिरदोस पटेल, विनोद भोसले, प्रिया माने, प्रवीण निकाळजे, वैष्णवी करगुळे, शिवलिंग कांबळे, श्रीदेवी फुलारे, अनुराधा काटकर यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

  आमदार शिंदे म्हणाल्या, की मोर्चासाठी आलेल्या महिला महागाई, नोटबंदीमुळे होरपळल्या. नोटबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक मंदी आली. लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयांची सक्ती केली असून कामगारांकडे तेवढा पैसा येणार कोठून. यंत्रमाग कामगारांचा प्रश्न सोडविल्याने अस्वस्थता आहे. नोटबंदीचा सर्वाधिक फायदा फक्त अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीला झाला असून त्यांची उलाढाल कोट्यवधींनी वाढली. पंतप्रधान मोदींचे भाषण फक्त झोल असून शासनाची धोरणं गोलमाल आहेत. मोदींनी स्वत: वयोवृद्ध आईला रांगेत उभे करून प्रसिद्धी मिळवली. पत्नीला सोडले. त्यांना महिला मुलींच्या प्रश्नांची काय जाणीव असणार? मोदींचा पैसा रामदेवबाबा त्यांच्या पतंजलीसाठी वापरत असल्याचा आरोप त्यांनी केला.
  आमदार म्हेेत्रे म्हणाले, की काँग्रेस विरोधात भाजपने सोशल मीडियावर विषारी प्रचार करून सत्ता मिळवली. पण, सध्या त्याच भाजप विरोधात सोशल मीडियात सर्वसामान्य लोक टीका करीत आहेत. जीएसटीमुळे गुजरातमध्ये भाजप विरोधात वातावरण निर्माण झाले. मोदींची राजवट हुकुमशाही पद्धती असल्याची टीका त्यांनी केली.

  माजी आमदार माने म्हणाले, “केंद्र राज्यातील भाजप सरकार प्रत्येक पातळीवर अपयशी ठरले. स्वत:च्या चुका झाकण्यासाठी मोठ्या योजनांच्या घोषणा अन् स्टंटबाजी करून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करीत आहेत. बुलेट ट्रेनची गरज नसतानाही स्वत:सह काही त्यांच्या हितचिंतकांच्या फायद्यासाठी ती आणली.

  गटनेते नरोटे म्हणाले, की महापालिकेचा अर्थसंकल्प होऊन चार महिने झाले तरी नगरसेवकांना विकासकामांसाठी एक रुपया देता आला नाही. आरोग्य केंद्रांची दुरवस्था आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घराची जागा आरक्षित असून जुळे सोलापुरातील पाच एकर जागा त्यांनी हडपली, असे आरोप त्यांनी केले.

  प्रणितीताई नव्हे आक्रोशताई
  शहराध्यक्षवाले म्हणाले, “माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शहरामध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर स्मार्टसिटी योजनेत सोलापूरचा समावेश केली. पण, त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू करण्याची क्षमता महापालिकेची नाही. केवळ दिशाभूल करण्यात येत असून जनता त्यांच्या राजवटीला त्रस्त झाली आहे.आमदार प्रणिती शिंदें यांचे कौतुक करताना त्यांनी ‘आक्रोशताई’ म्हणून संबोधले.

Trending