आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीपूजन आणि पाडव्यानिमित्त खरेदीस मोठी गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दिवाळी सणातील महत्त्वाचे लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या पूजेसाठी बाजारात ग्राहकांची रेलचेल सुरू झाली आहे. सकाळपासूनच शहरातील व्यापारी पेठा भरून गेल्या असून, विविध पूजा साहित्याची खरेदी होताना दिसत आहे. 
 
शहरातील मधला मारुती, टिळक चौक, कोंतम चौक, कन्ना चौक या मध्यवर्ती भागात तसेच हद्दवाढ परिसरातील आसरा चौक, चैतन्य भाजी मंडई, विजापूर नाका जोडबसवण्णा चौक, अक्कलकोट नाका, ७० फूट रोड आदी भागात ही दुकाने थाटण्यात आली आहेत. या पूजा साहित्यात फुले, केळीची पाने, पंच खाद्य, फळे, आकाशदिवे, पणत्या, मिठाई, साळीच्या लाह्या, भेंडबत्तासे आदींचा समावेश आहे. तसेच रंग रांगोळीचा बाजारही भरला आहे. लक्ष्मीपूजनाचे हिंदू धर्मियात अन्य धर्मियातही अनन्यासाधारण महत्त्व आहे. तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा पाडवाही अवघ्या दोन दिवसांवर आल्याने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. 
 
मुरुड शेंग कमळ बीज 
लक्ष्मीपूजनातओटी सामानाबरोबर मुरुड शेंग कमळ बीज ठेवले जाते. यंदाही दोन पाच मुरुड शेंग दोन कमळ बीजांचे पाकीट विक्रीस आले असून याची किंमत पाच रुपये आहे. तसेच गुलाबी आणि पांढरी कमळाची फुलेही विक्रीस अाली असून १० रुपयांना एक नग अशी विक्री होत आहे. 
 
भेंड, बत्तासे लाह्या 
जसेनागपंचमीला ज्वारीच्या लाह्यांचा मान असतो तसेच पाडव्याच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या विधीत साळीच्या लाह्या लागतात. यांची पाकिटे १० रुपयांपासून पुढे आहेत. तसेच साखरेचे भेंड बत्तासे यांचे पाकीटही १० रुपयांना आहे. धणे, जिरे, मूग, गुळ यांची पाकिटेही पाच-पाच रुपयांना आहेत. 
बातम्या आणखी आहेत...