आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एक नवी सिटी बस पेटली, विडी घरकुल परिसरातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिटीबसच्या बॅटरीला आग लागली. - Divya Marathi
सिटीबसच्या बॅटरीला आग लागली.
सोलापूर - महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील आणखी एका नव्या बसने शुक्रवारी पेट घेतला. मात्र, वेळीच लक्षात आल्याने आग विझविता आली आणि मोठा अनर्थ टळला. बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. दोन दिवसांपूर्वी अशीच आग लागून नवी बस खाक झाली होती. दोन दिवसांतच ही दुसरी घटना घडली.
शुक्रवारी सकाळी गोदूताई विडी घरकुल ते रेल्वे स्टेशन धावणाऱ्या बसच्या बॅटरीत धूर येऊ लागल्याचे चालक अश्वाथामा बेनूरे यांच्या लक्षात आले. त्यांनी २५ प्रवाशांना खाली उतरवले. बसमधील अग्निशमनचे दोन बंबद्वारे आग विझविली. घटनेची माहिती मिळल्यानंतर परिवहन व्यवस्थापक प्रदीप खोबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. परिवहन विभाग कर्मशाळेतील एक पथकाने ती बस सुरू करून मार्गास्थ केली.

केंद्राच्या जेएनयूआरएम योजनेतून २०० बस मंजूर केल्या. त्यापैकी १४० बसगाड्या आल्या आहेत. त्यातील अशोक लेलँड कंपनीची बस बुधवारी जळून खाक झाली. त्यात ५५ लाखांचे नुकसान झाले. त्याची चौकशी सुरू आहे.
विशेष सभा
परिवहन समितीची विशेष सभा घेण्याची मागणी सदस्य अनिल कंदलगी, अख्तर मणियार, आनंद मुस्तारे, शिवाजी मग्रुमखाने यांनी सभापती सलिम सय्यद यांच्याकडे केली. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलवण्यात आली आहे.
चौकशी करा
सिटी बसला वारंवार आग लागत असल्याने खरेदीबाबत संशय निर्माण होत आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशीची मागणी करणार आहे. त्यामुळे खरा प्रकार बाहेर येईल.” मल्लिनाथ याळगी, परिवहन, सदस्य