आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समाजकल्याण’च्या तत्कालीन अायुक्त फुले, दीपक घाटे यांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पूजा मागासवर्गीय निटिंग गारमेंट अौद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेत कोटी ४७ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश अासादेसह १४ जणांवर गुन्हा दाखल अाहे. या प्रकरणात समाजकल्याण विभागाच्या तत्कालीन सहायक अायुक्त मनीषा देवेंद्र फुले (वय ४८, रा. चिंताणी हाॅस्पिटलमागे, बिबवेवाडी, पुणे) तसेच दीपक भास्कर घाटे (वय ४९, रा. कोल्हापूर) यांना शुक्रवारी अार्थिक गुन्हे शाखेने अटक केली अाहे. 

फुले घाटे यांनी पदाचा गैरवापर करून संचालक मंडळासोबत संगनमत करून बनावट कागदपत्रे खरी अाहेत, असे भासवले. शासनाकडून मिळालेल्या निधीचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत समाजकल्याण विभागाचे सहायक निरीक्षक राहुल काटकर यांनी सदर बझार पोलिसांत तक्रार दिली होती. फुले घाटे या दोघांना शुक्रवारी सकाळी अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दुपारी न्यायाधीश पंकज बिदादा यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवस पोलिस कोठडी दिली. 

सरकारतर्फे संतोष पाटील, फुले यांच्यातर्फे महेश जगताप, शशी कुलकर्णी, घाटेतर्फे शीतल डोके या वकिलांनी काम पाहिले. यांच्यावरहीगुन्हा दाखल : संस्थेचेअध्यक्ष व्यंकटेश अासादे, उपाध्यक्ष रेणुका म्हेत्रे, शिवाजी दोडमनी, राजकुमार अासादे, अानंद म्हेत्रे, रवी अासादे, राजकुमार शेवटे, राधिका म्हेत्रे, शांता अासादे, मनीष म्हेत्रे, शिवानंद ममदापुरे. यात राजकुमार, अानंद, रवी, मनीष या चौघांना यापूर्वीच अटक झाली अाहे. 

काय अाहे नेमके प्रकरण...
अासादेसह बाराजणांनी मिळून पूजा मागासवर्गीय निटींग गारमेंट संस्था काढली. दोन कोटी लाख २४ हजार रुपये अार्थिक सहाय्य मिळवले. त्या पैशाचा वापर नियमाप्रमाणे करता एक कोटी ४७ हजार रुपयांचा अपहार केला. २०१३ मध्ये अपहार झाल्याचे समोर अाल्यानंतर माधव वैद्य यांची समिती चौकशीसाठी नेमण्यात अाली होती. त्यांनी चौकशी करून २७ नोव्हेंबर २०१३ रोजी संस्था अपात्र असल्याचे म्हटले होते. घाटे फुले या दोघांनी कागदपत्रे बनावट असतानाही त्याकडे कानाडोळा करून शासनाचे पैसे संचालक मंडळांना काढून घेण्यास मुभा दिली. 

अाणखी माहिती समोर येईल...
फुलेघाटे यांना अटक झाली असून, संस्थेत अपहार कसा झाला, पैशाचे काय केले अाहे, याची चौकशी सुरू केली अाहे. नागनाथ गायकवाड यांनाही सायंकाळी ताब्यात घेतल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी दिली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजार करण्यात येणार अाहे. 

शिष्यवृत्ती अपहारातही फुले घाटे आरोपी 
कोटी८७ लाखाच्या शिष्यवृत्ती अपहार प्रकरणातही मनीषा फुले दीपक घाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. त्यांना उच्च न्यायालयाने यापूर्वीच जामीन िदला अाहे. फुले घाटे या दोघांना जामीन देताना पोलिसांना तपास कामात मदत करण्याची अट घातली अाहे. अाज सकाळी सोलापुरात दोघांना चौकशीसाठी बोलावून घेतले. चौकशीनंतर पूजा गारमेंट प्रकरणात अटक केली. 

आयोगाच्या सूचना 
- साहित्याच्या नोंदी ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांकडून काढा.
- प्रत्येक सहायक आयुक्त कार्यालय स्तरावर अंतर्गत ऑडिट व्हावे. 
- योजनांवर देखरेख आणि नियंत्रण करणारा स्वतंत्र कक्ष असावा.
- प्रकल्प कार्यालयातील हिशेब अर्थ खात्यातील व्यक्तीने तपासावेत. 
- वस्तूंची खरेदी करण्याऐवजी लाभार्थींच्या खात्यात थेट अनुदान जमा करावे. 
- अन्य खात्यांच्या योजनांना आदिवासी विकास विभागाने फक्त निधी द्यावा, अंमलबजावणी करू नये. 
बातम्या आणखी आहेत...