आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैतागलेल्या ग्राहकांचा बँक उघडण्यास मज्जाव, कसबे तडवळे येथे राष्ट्रीयीकृत बँकेची एकमेव शाखा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राहकांनी बँक उघडण्याअगोदरच गर्दी करून अधिकाऱ्यांकडे मागण्या रेटल्या. - Divya Marathi
ग्राहकांनी बँक उघडण्याअगोदरच गर्दी करून अधिकाऱ्यांकडे मागण्या रेटल्या.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर ग्रामीण भागात बँकांसोरील रांगा अजूनही कमी झालेल्या नाहीत. रांगेत उभे राहून दिवसाला हजार रुपये मिळत असल्याने वैतागलेल्या ग्राहकांनी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या (बीओएम) अधिकाऱ्यांना मंगळवारी (दि. ६) बँक उघडण्यास मज्जाव केला. अधिकाऱ्यांनी दररोज २२०० रुपये देण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन दिल्यावर ग्राहकांनी माघार घेतली.
बीओएम व्यतिरिक्त येथे सोलापूर जनता सहकारी बँक उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. पतसंस्था आहेत. सहकारी बँकेत पतसंस्थांना पाचशे हजाराच्या नोटा स्विकारण्यास मनाई असल्याने ग्राहकांनी बँक ऑफ महाराष्ट्र (बीओएम) येथे जुन्या चलनाचा भरणा केला. त्यामुळे पैसे काढण्यासाठी याच बँकेत गर्दी आहे. येथील महाराष्ट्र बँकेला कसबे तडवळे गावासह खेडी जोडली आहेत. त्यामुळे गावातील ग्राहकांची बँकेत गर्दी होत आहे. परंतु या शाखेतून एका वेळी हजार रुपये देण्यात येत असल्याने ग्राहकांची पंचाईत झाली आहे. शेतकऱ्यांना शेतात कामाला असलेल्या मजूरांना पैसे देण्यासाठी बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे शेतात पिकांना पाणी द्यायचे की रांगेत उभे राहायचे, असा प्रश्न भेडसावत आहे. शनिवारी (दि.३) बँकेत कॅश नसल्याने पैसे दिले नाहीत. सोमवारी (दि. ५) कॅश नसल्याचे सांगण्यात आले. तरीही ग्राहक दिवसभर बँकेत ताटकळत उभे होते. मंगळवारी (दि. ६) बँक उघडण्याअगोदरच बँकेसमोर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शाखाधिकारी येताच ग्राहकांनी दररोज जादा प्रमाणात पैसे मिळावे, अशी मागणी करत बँक उघडण्यास मज्जाव केला. शाखाधिकारी रामबीरकुमार साहू यांनी ग्राहकांसोबत चर्चा करून दररोज २२०० रुपये देण्यात येतील, असे सांगितल्यावर ग्राहकांनी माघार घेतली. त्यानंतर व्यवहार सुरू झाले. यावेळी विजयसिंह जमाले, किशोर डाळे, गणेश जमाले, सिद्धेश्वर सुरवसे यांच्यासह ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

-ग्राहकांना दररोज२२०० रुपये देण्यापेक्षा आठड्यातून २-३ वेळा २४ हजार रुपये देण्यात यावेत. यामुळे रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचेल. शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यास वेळ मिळेल.
-किशोरडाळे, सामाजिक कार्यकर्ते
बातम्या आणखी आहेत...