आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक स्वार्थापोटी कट प्रॅक्टिस, टेक्निशियनच्या भरवशावर पॅथॉलॉजी लॅबोरेटरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मेडिसीन,सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, या आजारांची जननी म्हणजे पॅथॉलॉजी. परंतु अवती- भोवतीचे स्थिती विचित्र आहे. दहावी बारावीनंतर एक किंवा दोन वर्षे टेक्निशियनचा कोर्स करून गल्ली-बोळात टेक्निशियन पॅथॉलॉजी लॅब चालवताना दिसतात. स्वार्थ साधण्यासाठी चुकीच्या मार्गाने आणि कट प्रॅक्टिसच्या जोरावर निकृष्ट दर्जाच्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जागोजागी बोकाळल्या आहेत. यातून सर्वसामान्य जनतेचे नुकसान होत आहे. त्यांच्या अज्ञानाचा अगतिकतेचा फायदा घेण्याचे प्रकार घडतात, अशी माहिती पॅथॉलॉजिस्ट डॉ. भारत मुळे यांनी दिली. 

१५ नोव्हेंबर हा जागतिक पॅथॉलॉजी दिन.यानिमित्ताने डॉ. मुळे यांच्याशी "दिव्य मराठी'च्या प्रतिनिधीने संवाद साधला. डॉ. मुळे म्हणाले, पॅथॉलॉजी हा मेडिकल सायन्समधला इतर विषयांप्रमाणे महत्त्वाचा आहे. टेक्निशियन चालवत असलेल्या लॅबमध्ये निकृष्ट दर्जाच्या मशिनवर सर्रास तपासण्या करून अवैधपणे रिपोर्ट््स दिले जातात. तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टने पडताळणी करणेदेखील त्यांना गरजेचे वाटत नाही. अशा लॅबोरेटरीजमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशिनची वर्षानुवर्षे गुणवत्ता तपासणी केलेली नसते. त्यामुळे चुकीचे रिपोर्ट उपचार करणाऱ्या डॉक्टरांची दिशाभूल करणारे ठरू शकतात. चुकीच्या रिपोर्टमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

माहितीपटातून माहिती 
महाराष्ट्रअसोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट या पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या संघटनेमार्फत सर्व सामन्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ४० मिनिटांचा माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटात पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरी कोण सुरू करू शकतो. त्यासाठी पात्रता काय, वेगवेगळ्या चाचण्यांचे रिपोर्ट््स देण्याचे अधिकार कोणाला आहेत, सध्याची स्थिती नेमकी कशी आहे. अनधिकृत पद्धती या क्षेत्रात बोकाळलेल्या आहेत, याची माहिती दिली आहे. 

तर गुन्हा दाखल होऊ शकतो : डीएमएलटी अभ्यासक्रम पूर्ण केलेले स्वतंत्र्यपणे व्यवसाय करू शकत नाहीत. जरी करीत असतील त्यांच्यावर बोगस लॅब म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो, असे आदेश उच्चन्यायालयाने दिले आहेत. एमडी पॅथॉलॉजीच्या नियंत्रणाखाली त्यांना व्यवसायास मुभा आहे. परंतु सर्रास स्वतंत्र्यपणे व्यवसाय करीत आहेत, त्यावर जरब बसणे गरजेचे आहे. 

जागतिक पॅथॉलॉजी दिनानिमित्त मुळे पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये ज्येष्ठांसाठी मोफत मधुमेह तपासणी केली जाणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी वाजल्यापासून मुळे पॅथॉलॉजीमध्ये तपासणी होणार आहे. तसेच ज्येष्ठ वगळून इतरांना १० टक्के सवलत दिली जाणार आहे. 

एमडी पॅथॉलॉजीमध्येतपासणी केल्यानंतर ७० टक्के आजारांच्या अचूक निदान होते. रिपोर्टवरून तज्ज्ञ डॉक्टरांना उपचार करून घेण्यास मदत होते. जिल्ह्यात ४० पॅॅथॉलाॅजिस्ट आहेत. रुग्णांना डॉक्टरांनी काही तपासण्याच्या सल्ला दिला तर केली जाणारी तपासणी ही पॅथॉलॉजीच्या देखरेखीखाली त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये होते की नाही, केवळ टेक्निशियन्सनी चालवलेल्या अनधिकृत लॅबमध्ये होते, याचे अवलोकन करून खात्री करावी. आजाराच्या अचूक निदानावर योग्य उपचार अवलंबून आहे. चुकीचे रिपोर्ट््स आपल्या आरोग्याला घातक दिशाभूल करणारे ठरू शकतात. पॅथॉलॉजीमध्ये आयएचसी बारकोड सारखी नवीन प्रणाली आली आहे.
- डॉ.भारत मुळे, पॅथॉलॉजिस्ट 
बातम्या आणखी आहेत...