आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍हॉट्स अॅपवरील अफवांमुळे उडतो थरकाप, ग्रामीण भागात रात्री होते पळापळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अमूक शाळेतून मुलाला पळवले. उसाच्या पिकातून चोरटे पळाले. तलवारीने हल्ला केला. जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक चोर फिरतात अशा अफवा आहेत. नागरिक रात्र जागून काढत आहेत. सामूहिक गस्त घालत आहेत. संशयित कुणी व्यक्ती, वाहने गावातून जाताना अडवून मारहाण करणे, वाहने पेटवून देण्याचे प्रकार अफवेतून घडत आहेत.
मागील आठवड्यातील घटना
1. बार्शी-वैरागजवळील मालवंडी गावाजवळ जीपवर दगडफेक केल्यामुळे एक़ा महिलेचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनीच हा हल्ला केला त्यात ही वाईट घडली होती.
2. माढा तालुक्यात वडिलांचा मुलानेच खून करून चोरट्यांनी मारल्याचा बनाव केला होता. ही घटनाही पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली.

3. बॉम्बे पार्क, कुमठेगाव, सैफुल, बाळे, दहिटणे, होटगी, कुंभारी भागात अफवा आणि नागरिकांची पळापळ. कुमठे गावात शनिवारी रात्री चोरटे आल्याची अफवा पसरली. दोघेजण पळून गेले. एका संशयिताला पकडून नागरिकांनी चोप दिला. पण, तो तरुण चोर नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे.

4. टाकळी सिकंदरमध्ये ओरिसा राज्यातील तरुणालाही चोर समजून करण्यात आली होती मारहाण.
5. कामती, कुरूल, तेलंगवाडी भागात तिघांवर तलवार हल्ला झाला आहे. कातेवाडी गावात गावकरी, संशयित चोरटे यांच्यात हमरी-तुमरी झाली. परस्पर गुन्हेही दाखल झाले. पोलिसांनीही नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

ही अफवा गुजरातपर्यंत आहे
चोरीच्या अफवेचा गैरफायदा चोरटे घेऊन डाव साधत असतील. पण, संपूर्ण गावातच चोरटे आलेत ही बाब चुकीची आहे. नागरिकांनी सावध राहावे. हे अफवांचे पीक आपल्यासह गुजरात राज्यापर्यंत पोहोचले आहे. व्हॉट्सअपवर कुणी अफवा पसरवत आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. कृष्णकांत उपाध्याय, अक्कलकोट उपविभागीय अधिकारी
शंका आल्यास संपर्क साधा
शहरातही अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार आहोत. चोरीच्या घटना अफवा आहेत. संशयित सापडल्यास पोलिसांना माहिती द्या. पेट्रोलिंग, नाकाबंदी आहेच. रात्री नऊ ते बारा पहाटे सहापर्यंत अशा दोन टप्प्यात आमचे पथक गस्त देत आहेत. कुणाला शंका आल्यास माहिती द्या. शर्मिष्ठा घारगे, सहायक आयुक्त गुन्हे शाखा
औरंगाबादमध्येही होते केवळ अफवांचे पीक
औरंगाबाद शहर-जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वी मुले पळविणारी टोळी आल्याची व्हॉट्सअपवरून ही अफवा होती. यात कन्नड गावात एका संशयित तरुणाला मारहाण झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. तपासात तो तरुण गतिमंद असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, हा अफवेचा बळी होता. कालांतराने पोलिसांनी कडक भूमिका घेऊन कारवाई केल्यामुळे घटना थांबल्या.
याकडे लक्ष द्या !
अनोळखी व्यक्ती, वाहन दिसल्यास नियंत्रण कक्षात फोन करा (०२१७-२७३२०००)
कोणत्याही सोशल मीडियावरील पोस्टची खात्री करा
अफवांपासून लांब राहा, अनोळखी व्यक्तीकडून प्रसाद अथवा अन्य पदार्थ घेऊ नका.