आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daily 140 MLD Water, How Less It Collectior Mundhe

रोज १४० एमएलडी पाणी उचलता, मग कमी का पडते? - जिल्हाधिकारी मुंढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराला स्मार्ट करताना आगामी काळाची जाणीव ठेवून काम केले पाहिजे. तात्पुरते पर्याय शोधण्यापेक्षा ठोस उपाय शोधले पाहिजेत. शहरात पाणीपुरवठ्याची मोठी समस्या आहे. त्यातील त्रुटी दूर होण्याची गरज आहे. शहरासाठी दररोज उजनी औज बंधाऱ्यातून १४० एमएलडी पाणी उपलब्ध असताना मनपा दिवसाआड पाणीपुरवठा करू शकत नाही. वितरणात त्रुटी असल्याने शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, असा ठपका ठेवत जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी मनपाचे कान टोचले. दरम्यान, एनटीपीसी जलवाहिनी कामासंदर्भातील आढावा बैठकीत पालक सचिव मिलिंद म्हैसकर यांनी एनटीपीसी पाणी मिळण्याबाबत शहरवासीयांना चौथा वायदा केला. परंतु नागरिकांच्या आरोग्याशी निगडित पिवळसर पाण्याच्या विषयावर चर्चाच झाली नाही शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाल्याने जिल्ह्याचे पालक सचिव मिलिंद म्हैसकर नगर विकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांचा सत्कार शनिवारी मनपा सभागृहात झाला. त्यावेळी जिल्हाधिकारी मुंढे बोलत होते. जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले, शहर पाणीपुरवठ्यात ताळमेळ नसल्याने पाणी असतानाही वितरित होत नाही. यावर आताच उपाय शोधले पाहिजे, शिवाय शहरातील स्वच्छता शिस्तीसाठी खडतर प्रयत्न करावे लागतील. घनकचरा व्यवस्थापनासाठी नागरी सहभाग महत्त्वाचा आहे. तरच कचरा नियोजन होईल. ओला सुका कचरा वेगळा करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. शहरात अतिक्रमण प्रदूषण वाढू नये यासाठी पाच वर्षाचे धोके आताच ओळखून पाऊल उचलले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न व्हावेत
शहराला २० वर्षांपासून नदीपात्राद्वारे पाणीपुरवठा होतो. शासन आता एनटीपीसी जलवाहिनीतून पाणी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पाण्याचा प्रश्न सुटला तर बेरोजगारांचा प्रश्न सुटेल. शहरातून स्थलांतरित होणारे लोक थांबतील. त्यामुळे पाण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. औज आणि उजनी जलवाहिनीतून शहराला १४० एमएलडी पाणी मिळते. दरडोई(प्रती माणसी) पाणी वापराचे प्रमाण १३५ लिटरचा आहे. गळती मोठी असल्याने प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत १०० एमएलडी पाणी मिळते. पाण्याच्या नियोजनात चुका आहेत. एका ठिकाणी २४ तास पाणी तर एका भागात तास पाणीपुरवठा होेत असल्याचे दिसून येते. समान पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणी वितरणात सुधारणा आवश्यक आहे. शासनाने पाण्याचे पैसे मागितल्यास जिल्हाधिकाऱ्यांचा धिक्कार मनपा सभागृहात केला जातो, चांगली बाब आहे, असे मार्मिक टोलाही मुंढे यांनी लगावला.

मैदानांची जागा त्याच कारणासाठी वापरा
शहरात शासकीय जागा देताना अनियमितता झाली आहे. त्यात मनपाने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. ज्या कारणासाठी शासनाने जागा मनपास दिली त्याच कारणासाठी वापर झाला पाहिजे. अन्यथा शासन ती जागा परत घेईल. नागरिकांना मैदान हवे आहेत.(होम मैदानाच उल्लेख करता...) मैदानाचा वापर नागरिकांसाठी झाला पाहिजे, असे जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले. महापालिकेचे उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे, असे मुंढे म्हणाले.