आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुजन सेवेकऱ्यांच्या पूजेची पहिली आषाढी, श्री विठ्ठलाच्या पौरोहित्य परंपरेची चौकट मोडीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ श्री तुकोबारायांचा हा अभंग पंढरीत सार्थ ठरतो आहे. आषाढी एकादशीला यंदा प्रथमच बडवे, उत्पातांऐवजी श्री विठ्ठलाच्या पूजेला बहुजनांतील सेवेकरी आहेत. पौरोहित्याची उतरंड मोडीत काढून देव-भक्तातील मध्यस्थी नाकारणारे देशातील बहुधा हे पहिलेच पाऊल असावे. पंढरपूर मंदिरात दोन महिलांसह बहुजन समाजातील ९ सेवेकरी नेमण्यात आलेले आहेत.

विठ्ठल मंदिरात मे १९४६ पर्यंत अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. मंदिर खुले करण्यासाठी साने गुरुजींनी उपोषण केले होते. पुढे १९७३च्या कायद्यानुसार मंदिर देवस्थान शासनाच्या ताब्यात आले. या कायद्याविरुद्ध बडवे व उत्पातांनी न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला चालला. सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये बडवे, उत्पातांची याचिका फेटाळली. त्यामुळे पूजेसाठी विविध जाती-धर्माचे लोक नेमण्याचा मार्ग मोकळा झाला. १ आॅगस्ट २०१४ पासून बहुजन सेवेकरी सेवेत रुजू झाले.

बहुजातीय पुजारी : कृष्णदास नामदास, यशवंत गुरव, राचय्या हिरेमठ, अमोल वाडेकर, रवींद्र स्वामी, ऊर्मिला भाटे, हेमा आष्टेकर, प्रसाद पुजारी, महेश पुजारी हे बहुजातीय पुजारी नियुक्त झाले.

वारीत ‘धम्मपदयात्रा’
अडीच हजार वर्षांची परंपरा सांगणा-यावारीकाळात यंदा भंते ज्ञानज्योती थेरो, धम्मपाल संघज्योती व आर्यज्योती यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाकोरेगाव ते पंढरपूर अशी धम्मपदयात्रा काढली. १७ जुलै रोजी निघालेली ही पदयात्रा पंढरीत २७ रोजी पोहोचत आहे. हेही यंदाचे वेगळे वैशिष्ट्य ठरले.

प्रथमच वारकरी निवास व्यवस्था
उच्च न्यायालयाच्या सतर्कतेमुळे वारीकाळातील प्रदूषणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. ६५ एकरांवर किमान ३७५ दिंड्यांतील ८० हजार वारकऱ्यांची निवास व्यवस्था. सुविधा हा वेगळा प्रयोग आहे. पिण्याचे पाणी, तात्पुरती १६ हजार शौचालये, दळणवळण अशा सुविधा पुरवल्या आहेत. पंधरा दिवसांत ४ कोटी ६५ लाख रुपये खर्चून वारकरी तळ उभारला. नदीपात्रात निर्माल्य टाकण्यावर बंदी अाहे.
छायाचित्र: पंढरपुरातील रुक्मिणी मातेची पूजा करताना महिला सेवेकरी.