आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक इमारतीमधील रहिवाशांची झाली सोय, तीन दिवसांपूर्वी घरांची झाली होती पडझड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नीला नगरातील दोन मजली चाळीच्या इमारतीचा काही भाग मंगळवारी रात्री कोसळला होता. यामुळे या इमारतीमधील तीन कुटुंबीय उघड्यावर आले होते. याच परिसरातील काही इमारतीमध्ये जागा मालकांनी त्यांची सोय करून दिली. यामुळे ऐन दिवाळीसमोर या रहिवाशांच्या डोक्यावर छत मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते.

या धोकादायक इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर सहा आणि खाली सहा असे बारा ब्लॉक आहेत. यामध्ये पूर्वी बारा कुटुंबे होती. इमारत धोकादायक झाल्यामुळे सध्या तीनच कुटुंबे राहतात. वरच्या मजल्यावर शशिकला कराळे यांचे तीन सदस्यीय कुटुंब आहे. खालच्या तळमजल्यावर भारत क्षीरसागर यांचे सहा सदस्यीय आणि शकुंतला बचुटे यांचे दहा सदस्यीय कुटुंब राहत आहे. बुधवारी जेव्हा इमारतीचा काही भाग कोसळला तेव्हा वर आणि खालच्या मजल्याच्या खोल्यामध्ये तिन्ही कुटुंबाचे सदस्य राहात होते. मधल्या खोलीमध्ये असल्यामुळे त्यावेळी सुदैवाने जीवित हानी झाली नव्हती. या तिन्ही कुटुंबीयांना चाळीतील खुल्या जागेवर पत्र्याचे शेड महापालिकेच्या माध्यमातून मारून देण्याचे आश्वासन आनंद चंदनशिवे यांनी दिले होते. मात्र जागामालकांनी चाळीतील इतर इमारतीमधील रिकाम्या ब्लॉकमध्ये या तिन्ही कुटुंबीयांची राहण्याची सोय करून दिली. यामुळे ते ब्लॉक स्वच्छ करून तेथे राहायला जायची तयारी हे रहिवासी करीत आहेत. दिवाळी सणापूर्वी त्यांच्या राहण्याची सोय झाल्यामुळे या रहिवाशांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

आमच्या इमारतीमधील शेजारच्या व्यक्तींच्या खोल्यांचा भाग कोसळला. आमच्या खोल्याही कधी कोसळतील सांगता येत नव्हते. ज्या दिवशी इमारत पडली त्या रात्री आम्ही शेजारच्या लोकांकडे राहिलो. जागामालकांनी आम्हाला आमच्या चाळीतील दुसऱ्या इमारतीतील खोल्या राहण्यासाठी दिल्या. अाम्ही ते स्वच्छ करून तेथे स्थलांतर करतोय. - अश्विनी बचुटे, रहिवासी
बातम्या आणखी आहेत...