आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने, वाहने, सज्ज झाली दालने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विजयादशमीच्या मुहूर्तावर ग्राहकांच्या स्वागतासाठी सोमवारीच बाजारपेठा उजळून निघाल्या. सोने, वाहने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची दालने सज्ज होती. रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणुकीची अपेक्षा आहे. यंदा भरपूर पाऊस झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातूनही ग्राहकांकडून मोठी खरेदी होईल, असे व्यापाऱ्यांना वाटते.
गेल्या आठवड्यात सोन्याने प्रती दहा ग्रॅम ३१ हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. ऑक्टोबरला तब्बल ३१ हजार ४०० रुपये दर होता. आठ दिवसांतच त्याचे दर १४०० रुपयांनी कमी झाले. सोमवारी त्याचा दर होता ३० हजार रुपये. दसऱ्याच्या दिवशीही हाच दर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.

हजार टीव्ही, ४०० फ्रीज
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या खरेदीत यंदा मोठी उलाढाल होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. विविध कंपन्यांच्या शोरूममधून विविध योजना देण्यात आल्या आहेत. टीव्हीवर मिक्सर मोफत, वॉशिंग मशिनवर टोस्टर मोफत आदी योजनांचा समावेश आहे. खरेदी पश्चात लकी ड्रॉ कूपन्स, चांदीचे नाणे भेट देणार आहेत. मोबाइल खरेदीवर सीमकार्ड फ्री, नेट पॅकचे कार्ड मोफत आहे. तसेच पेनड्राइव्ह किंवा मेमरी कार्ड मोफत आहे. फायनान्स सुविधा ही योजना दिल्याने केवळ एक रुपया भरून वस्तू घरी घेऊन जाता येईल, असे आनंद मानवाणी यांनी सांगितले.

^यंदा पाऊसमान चांगला झाल्याने मोठी खरेदी होईल, अशी आशा आहे. महिलांसाठी खास फॅन्सी दागिने दसऱ्याच्या मुहूर्तावर देण्याचे नियोजन केले.” आनंद सोनी, सराफ व्यापारी

५०० दुचाकी, २०० कार
विविधकंपन्यांच्या वाहन वितरकांकडे मोठ्या प्रमाणात पूर्वनोंदणी झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे ५०० दुचाकी २०० चारचाकी गाड्या रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. चारचाकींसाठी ग्रामीण भागातून चांगली मागणी असल्याचे वितरकांनी सांगितले. शहरातील वितरकांच्या दालनात सोमवारी नव्या कोऱ्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या.
घरांच्या आकर्षक योजना
बांधकामव्यावसायिकांनी नव्या गृहप्रकल्पांची घोषणा केली. शहराच्या हद्दीत आकर्षक योजना दिल्या. सामान्य ते मध्यमवर्गीयांच्या बजेटमधील ही घरे आहेत. १२ ते १५ लाखांत रो-हाऊस, तितक्याच दरात वन-बीएचके फ्लॅट अाणि त्यात आणखी ते लाखांची भर टाकल्यास टू-बीएचके फ्लॅटस् देण्याची ही योजना आहे.
बातम्या आणखी आहेत...