आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दसरा, धम्मचक्र प्रवर्तन अन् मोहरम; खाकी झाली सतर्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विजयादशमीला सीमोल्लंघनासाठी शक्तिदेवीच्या मिरवणुका काढल्या जातात. याच दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुकाही निघतात. सकाळच्या प्रहरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष पथसंचलन शहराच्या तीन ठिकाणांहून निघणार आहे. बुधवारी मोहरम असला तरी मंगळवारी काही ठिकाणी पंजांच्या मिरवणुका निघणार आहेत. अशा उत्सवी वातावरणात चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
दीड हजारांहून अधिक पोलिसांचा ताफा नेमण्यात अाला अाहे. दसऱ्याच्या दिवशी बुधवार पेठ, शिवाजी चौक ते डाॅ. अांबेडकर पुतळा मार्गावर देवी मिरवणुका आणि धम्मचक्र प्रवर्तन मिरवणुका निघतात. त्यामुळे या मार्गावर मोठी गर्दी असते. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी तात्पुरता बदल करण्यात अाला अाहे. पंजांच्या मिरवणूक मार्गावरही नियोजन करण्यात अाले.

ये-जाकरू शकता
मंगळवारी शहरातील सात रस्ता ते डीआरएम कार्यालय, भय्या चौक, कल्पना चित्रपटगृहाच्या जवळील बोळातून अथवा फौजदार चावडी पोलिस स्टेशन ते रामलाल चौक, भय्या चौक, कल्पना टाॅकीज, मुरारजी पेठ ते शिवाजी चौक. तसेच नवी पेठ, लकी चौक, सावरकर मैदान ते दत्त चौक ते पंचकट्टा, शिवछत्रपती रंगभवन, गरुड बंगला सातरस्ता या मार्गावरून ये-जा करता येणार आहे.

उत्सव शांततेत करा
^सर्वधर्मीयांचा उत्सव एकत्रित असल्याने पोलिस यंत्रणेवर ताण पडला. सर्व उत्सव भक्तिभावात आणि शांततेत करण्यासाठी नागरी सहभाग महत्त्वाचा आहे. पोलिसांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे, पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, गर्दीतून जाताना मोबाइल सांभाळावे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. रवींद्र सेनगावकर, पोलिस अायुक्त

असा आहे ताफा
तीन उपायुक्त, चार सहायक अायुक्त, १८ निरीक्षक, ७० सहायक निरीक्षक, फौजदार, ९०० पोलिस कर्मचारी, ४५० होमगार्ड, एक राज्य राखीव दलाची तुकडी बंदोबस्तासाठी नेमण्यात अाली. रूपाभवानी मंदिरातून पालखी मिरवणूक निघते. पार्क चौकातील शमी वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येते. या सीमोल्लंघनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे शिवाजी चौक ते नवीवेस मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...